Skip to main content

Posts

Showing posts from 2015

पत्र किल्ल्यांना- प्रतापगड

(सर्वप्रथम सर्व वाचकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! सरले वर्ष चांगले गेले असेल आणि येणारे वर्ष सुद्धा चांगलेच जाईल अशी अशा मी व्यक्त करतो..)
बरेच दिवस झाले पत्र किल्ल्यांना हि लेखमाला काढून आणि त्यात दर महिन्याला एक पत्र असेल असेही म्हणालो होतो तर कदाचित तुम्हाला वाटले असेल की विसरला की काय हा! तर तसं नाही आहे.. दुसरे पत्र भोरप्या डोंगरावरील प्रतापगड या निव्वळ शिवरायांच्या गडाला लिहिण्याचे ठरवले आणि लेखणी (कीबोर्ड) सरसावली..

प्रिय प्रतापगड,
तुझ्या प्रिय दोस्ताने तुला सांगितले की नाही मला माहिती नाही पण एक साधारण कल्पना देतो की मी असे पत्र लिहिण्याचा चंग बांधला आहे आणि याआधी नंदादिपास लिहिले आहे तर आता दुसरा नंबर तुझा येतो म्हणून हा खटाटोप..
तुला आठवत असेलच तो दिवस, महाराज आणि मोरोपंतांची जावळीवरून नजर फिरताच एक बलाढ्य आणि सभोवताली केवळ ताशीव कडे असणारा डोंगर नजरेस पडला.. जावळीच्या भयाण जंगलात, वन्य श्वापदांच्या सहवासात असणाऱ्या त्या भोरप्या डोंगराचे महत्व महाराजांना ठळकपणे जाणवले आणि मोरोपंतास आज्ञा दिली की किल्ला बांधोनी काढावा... अन हळूहळू आकारास आलास तू.. दुर्गम,अवघड आणि…

Korigad And Tailbail- A photography tour

Before publishing second blog of my rayreshwar-kenjalgad trek, I just thought of publishing a photo blog of my recent trek to korigad and talbail..  Here I Wont narrate a story, but just want to show you my sahyadri through photos..
Fort name: Korigad and Tailbail
Region: Lonavala
How to Go: Pune-Lonavala- Ghusalkhamb-Amby vally(old sahara city)-Korigad- saltar pass- Tailbail
Time required: 30 minutes to climb korigad And 20 minutes to Tailbail
Best Season: June-Octoberपत्र किल्ल्यांना (रायगड भाग-2) {A letter to Raigad}

भाग एक पासून सुरु …. 

मिळालेला प्रतिसाद आणि काही मित्रांचा आग्रह यामुळे इतर ब्लॉग सोडून आधी दुसरा भाग लिहायला घेतला, तसेच त्या बिचाऱ्या दुर्गदुर्गेश्वरालाही ताटकळत ठेवणे बरोबर नाही... तेव्हा पत्र रायगडाला भाग २------
प्रियरायगडयांस,

सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये.. कालच परीक्षा संपली आणि गेले ३० दिवस मनात अडवून ठेवलेल्या भावनांना आज पन्हाळी लागली.. तुला आधी लिहिलेले पत्र लोकांनी पण वाचलं आणि त्यांना ते खूप आवडलं, तुलाही आवडलं असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या व शेवटच्या भागाला सुरुवात करतो..(शेवटचा म्हणजे सध्यापुरता शेवटचा, पुढे बोलणं होईलच)
तर मागच्या पत्रात मी बाजारपेठेपर्यंत आलेलो, ती प्रचंड बाजारपेठ बघून पुढे निघालो आणि आमचा मोर्चा वळाला तो जगदीश्वर मंदिराकडे.. वाटेत एका ठिकाणी थांबवून ताईने आम्हाला दूरवर स्पष्ट पणे दिसणारे राजगड आणि तोरणा दाखवले.. त्यांना लांबूनच हात केला आणि बरं का!! तसाच हात तुला सुद्धा केला होता, जेव्हा मी राजगड आणि तोरण्यावर गेलो होतो..पण तु नेहमीप्रमाणे busy!!!!
थोड्याच वेळात आम्ही मंदिराजवळ येवून पोहोचलो. साध्या बांधणीचं ते शिवमंदिर मनाला प्रचंड भावलं. जरा हाश…

पत्र किल्ल्यांना (रायगड भाग-१) {A letter to Raigad}

नवीन ब्लॉग सुरु केल्यापासून चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग नुसतं प्रवास वर्णन लिहिण्यापेक्षा काहीतरी नवीन करावं असं मनात आले. त्यामुळे ही नवीन लेखांची मालिका सुरु करावी असा विचार मनात आलं. तेवढ्यासाठीच हा खटाटोप. संपूर्ण सांगत बसत नाही. हळू हळू जशी लेखमालिका पुढे जाईल तसे कळेलच. त्यासाठी पहिला मान रायगडचा।.

 तारीख: शके १९३७, भाद्रपद कृ. दशमी
प्रिय रायगड यांस,       ई-मेलच्या जमान्यात पत्र लिहिणे म्हणजे फारच मागासलेले पणाचे लक्षण आहे हे जरी तितकच खरे असले तरी पत्र ज्याला लिहितोय तो ‘तु’ स्वतः जुन्या काळातील असल्याने पत्र लिहिण्याचे धाडस दाखवतोय.. तसही तुला हजारो पत्रांची सवय असेलच.. असो!! तर तुला सांगायचा मुद्दा असा की सध्या एक नवीन ब्लॉग सुरु केलाय आणि त्यात मी ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणची माहिती देण्याचा प्रयत्न करणारे.. ऐकून तु कदाचित सुखावलाही असशील, पण माझं तेवढ्यावर समाधान झालं नाही..     असंच एकदा विचार करत बसलेलो तेव्हा लक्षात आलं की मी प्रवासवर्णने लिहिणार, त्यात सगळी माहिती देणार, लोकांना झाला तर त्याचा उपयोग होणार पण तरी त्यातून तुम्हा साऱ्या सवंगड्यांचे कौतुक नाही करता ये…