Skip to main content

Posts

Showing posts from October, 2015

पत्र किल्ल्यांना (रायगड भाग-१) {A letter to Raigad}

नवीन ब्लॉग सुरु केल्यापासून चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग नुसतं प्रवास वर्णन लिहिण्यापेक्षा काहीतरी नवीन करावं असं मनात आले. त्यामुळे ही नवीन लेखांची मालिका सुरु करावी असा विचार मनात आलं. तेवढ्यासाठीच हा खटाटोप. संपूर्ण सांगत बसत नाही. हळू हळू जशी लेखमालिका पुढे जाईल तसे कळेलच. त्यासाठी पहिला मान रायगडचा।.

 तारीख: शके १९३७, भाद्रपद कृ. दशमी
प्रिय रायगड यांस,       ई-मेलच्या जमान्यात पत्र लिहिणे म्हणजे फारच मागासलेले पणाचे लक्षण आहे हे जरी तितकच खरे असले तरी पत्र ज्याला लिहितोय तो ‘तु’ स्वतः जुन्या काळातील असल्याने पत्र लिहिण्याचे धाडस दाखवतोय.. तसही तुला हजारो पत्रांची सवय असेलच.. असो!! तर तुला सांगायचा मुद्दा असा की सध्या एक नवीन ब्लॉग सुरु केलाय आणि त्यात मी ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणची माहिती देण्याचा प्रयत्न करणारे.. ऐकून तु कदाचित सुखावलाही असशील, पण माझं तेवढ्यावर समाधान झालं नाही..     असंच एकदा विचार करत बसलेलो तेव्हा लक्षात आलं की मी प्रवासवर्णने लिहिणार, त्यात सगळी माहिती देणार, लोकांना झाला तर त्याचा उपयोग होणार पण तरी त्यातून तुम्हा साऱ्या सवंगड्यांचे कौतुक नाही करता ये…