Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015

पत्र किल्ल्यांना- प्रतापगड

(सर्वप्रथम सर्व वाचकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! सरले वर्ष चांगले गेले असेल आणि येणारे वर्ष सुद्धा चांगलेच जाईल अशी अशा मी व्यक्त करतो..)
बरेच दिवस झाले पत्र किल्ल्यांना हि लेखमाला काढून आणि त्यात दर महिन्याला एक पत्र असेल असेही म्हणालो होतो तर कदाचित तुम्हाला वाटले असेल की विसरला की काय हा! तर तसं नाही आहे.. दुसरे पत्र भोरप्या डोंगरावरील प्रतापगड या निव्वळ शिवरायांच्या गडाला लिहिण्याचे ठरवले आणि लेखणी (कीबोर्ड) सरसावली..

प्रिय प्रतापगड,
तुझ्या प्रिय दोस्ताने तुला सांगितले की नाही मला माहिती नाही पण एक साधारण कल्पना देतो की मी असे पत्र लिहिण्याचा चंग बांधला आहे आणि याआधी नंदादिपास लिहिले आहे तर आता दुसरा नंबर तुझा येतो म्हणून हा खटाटोप..
तुला आठवत असेलच तो दिवस, महाराज आणि मोरोपंतांची जावळीवरून नजर फिरताच एक बलाढ्य आणि सभोवताली केवळ ताशीव कडे असणारा डोंगर नजरेस पडला.. जावळीच्या भयाण जंगलात, वन्य श्वापदांच्या सहवासात असणाऱ्या त्या भोरप्या डोंगराचे महत्व महाराजांना ठळकपणे जाणवले आणि मोरोपंतास आज्ञा दिली की किल्ला बांधोनी काढावा... अन हळूहळू आकारास आलास तू.. दुर्गम,अवघड आणि…