बालपणीच्या आठवणी!

भटकंतीसोबत मला , गोष्टी आणि कविता लिहिण्याचा सुद्धा छंद आहे, तर मधून मधून असे काही लेख व कविता इथे देण्याचा प्रयत्न करेन!
जरासं वेगळं !

बालपणीच्या आठवणी!एके दिवशी सकाळ झाली
नवी कल्पना देऊन गेली
बघता गवाक्षातून बाहेर
बालपणीची आठवण झाली

बालपणीचे चिऊ काऊ
केव्हाच दूर उडून गेले
जाता जाता शर्यतीतल्या
सशालाही घेऊन गेले

उरलेल्या काही आठवणी
मंद गतीने जात आहेत
जाता जाता सोबत
कासवालाही नेत आहेत

चॉकलेटचा तो बंगलाही
आता विरघळून गेलाय
त्याचे ते टॉफीचे दार फक्त
तेवढे शिल्लक राहिलंय

निंबोणीच्या झाडामागे सुद्धा
आता चंद्र दिसत नाही
भोलानाथ नाही म्हणून
हल्ली पाऊसही पडत नाही

आंब्याच्या बनात नाचायला
हल्ली मोरानाही वेळ नाही
तळ्यातल्या त्या पिल्लाला
कुरूप नसल्याची जाणीव होई

झुकू झुकू आगीनगाडीसुद्धा
सध्या बंद आहे
नोकरीच्या निमित्ताने
मामा सुद्धा बाहेर आहे.

बालपणीच्या त्या गीतांचा
सूर काही सापडत नाही
ठणाणणाऱ्या त्या रेडीओचा
आवाज नेमका खराब होई.

विस्मृतीत गेले सारे
दिवस त्या बालपणाचे
आता फक्त एकाच काम
खिडकीतून बाहेर बघत बसण्याचे

 - पुणे,२०१५                        

You Might Also Like

1 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });