इंद्रधनू

जलबिंदुस त्या भेदून गेले
रविकिरण ते आरपार
सप्तरंग उधळीत आले
इंद्रधनुवर होऊन स्वार
ता ना पि हि नि पा जा
रंग ते असती सात
सदैव सोबत कधी न सोडती
एकमेकांची घट्ट साथ
कधी अर्धे अन कधी पूर्ण
वेगवेगळी नावे त्यांस
अर्धवट ते इंद्रधनू
अन इंद्रव्रज ते पूर्णत्वास
क्षणभंगुर  हे रत्न
निसर्गाचे असती खास
पाहूनी त्यासी मज होई
श्रावणात या हर्षोउल्हास
-पुणे, 2016


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });