Skip to main content

Posts

Showing posts from July, 2016

पुण्यनगरीचे कातळशिल्प! - पाताळेश्वर

ते म्हणतात ना 'पुणे तिथे काय उणे'! या उक्तीचा अनुभव मला पुण्यात आल्यावर पदोपदी येत होता! पुण्यात आल्यावर किल्ले, लेण्या फिरायची सवय झाली आणि मग डोक्यात किडा वळवळायला लागला की एवढं ऐतिहासिक पुणे पण इथे लेणी कशी नाहीत!! जरा इकडे तिकडे शोधाशोध केली आणि बरंच काही गवसलं!!
   पर्वतीचे लेणं, बाणेरच्या गुहा, चतुर्श्रुंगी आणि जंगली महाराज रस्त्यावरचे पाताळेश्वर! तर आजचा हा लेख हा या कातळशिल्पावर!!


   पुणे शहराचा इतिहास बघायला गेलं तर इथे अनेक राजवटी नांदल्या!! त्यापैकी इसवीसनाच्या आठव्या शतकात पुणे परिसरावर राष्ट्रकूट राजवटीचा अंमल होता!! आणि साधारण त्याच कालावधीमध्ये भांबुर्डा गावठाणाजवळ (सध्याचे शिवाजीनगर, पूर्वी या भागाला भांबवडे म्हणले जायचे, त्याचे नामांतर इंग्रजांनी भांबुर्डे केले आणि पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर असे नामकरण झाले). हे मंदिर जमिनीपासून साधारणपणे १.-२ मीटर खाली असल्याने कदाचित याला पाताळेश्वर असे नाव दिले असावे!

   'या लेण्याचे सध्याचे स्थान म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरचे, जंगली महाराज मंदिराच्या शेजारी'. 

    पुणे शहराच्या हेरिटेज कम…

Mysterious Places on the earth---- Part 1

The mystery of Nazca desert
    Mystery! Every day we live with this word. Why some things happen? Or who is behind all of this? This whole world is full of mystery. Starting from ‘The Bermuda Triangle’, then ‘The Great Pyramids of Giza’ or stories of UFOs’ flying in the sky! Most of these stories are either true i.e. having valid historical proof but some stories are the imagination of human brain or who knows, maybe someone is watching us from outside the Earth.
    Few days back when I was watching an episode of ‘Ancient Aliens’ on YouTube, I saw something on The mysterious ‘Nazca Lines’ and I found that topic interesting and decided to collect some information on this mysterious place. So, this article is going to be a short summary of that collected information! Okay, first let me clear myself that, I am not inventing anything or not having any deep research on Nazca lines so you will also find this information on internet, but in a scattered manner!
   Nazca lines are the series o…

सफर वसई आणि अर्नाळ्याची- भाग एक

माणिकगड ट्रेक नंतर काही दिवस आराम करायचे ठरवले, पण तेवढ्यात बाबांनी मुंबई दर्शन या घरघुती सहलीचे बुकिंग करून टाकले. त्यात Elephanta caves, थोडी फार मुंबई आणि मग विरारची जीवदायिनी देवी असा कार्यक्रम ठरला.. पण विरार नाव ऐकताच माझे डोळे चकाकले.. आणि माझ्यातला ट्रेकर जागा झाला.. २ नावे झरकन डोळ्यासमोर आली, ती म्हणजे किल्ले वसई आणि किल्ले अर्नाळा!!!! उत्तर कोकणातले दोन बुलंद किल्ले.! एक जमिनीवरचा तर एक फेसाळणाऱ्या दर्यात भक्कम पाय रोऊन उभा असणारा.. एक पोर्तुगीजांच्या सामर्थ्याची आणि चिमाजी अप्पांच्या अजोड शौर्याची गाथा सांगणारा तर दुसरा पुण्यातील शनिवारवाड्याची आठवण करून देणारा!! ठरलं, या सहलीत सुद्धा २ किल्ले पदरात पाडायचे आणि मग हो, नाही करता करता जीवदायिनी cancel करायचे ठरवले...
मुंबई दर्शनची सुरुवात तर झकास झाली, Elephanta caves आणि इतर स्थळे पाहताना २ दिवस मजेत गेले. आणि शेवटी तो दिवस उजाडला.. तारीख होती २१ मे.. मुंबईची ती दमट हवा आणि मे महिन्यातले भाजून काढणारे उन, पण वसई आणि अर्नाळा पुढे बाकी कोणत्याच गोष्टीचे काही वाटत नव्हते.. आम्ही वडाळ्याला गेस्ट हाउस वर राहात होतो.. सकाळी लवकर आव…