अस्तित्व २०१६ |
अस्तित्व! केवळ हे टिकवण्यासाठीच आपण आयुष्यभर झटत असतो! मी सुद्धा याच कारणाने बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला आणि सुरु झाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा एक प्रवास, त्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो महाविद्यालयाच्या ‘अस्तित्व’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमुळे. खरं सांगायचं तर ११वी मध्ये असताना यात फारसा रस घेतलाच नाही. इतर मुलांप्रमाणे event च्या दिवशी जाऊन फक्त हजेरी लावायचे काम केले. १२वी मध्ये असताना थोडा फार involve झालो! पण ती involvement केवळ चला जाऊन बघू या सदरात मोडणारी होती.
माझ्यातले
खरे अस्तित्व शोधायला कॉलेजचे first year उजाडले अन अगदी सुरुवातीपासून इंटरेस्ट
घेतल्यामुळे इतर ३ जणांसोबत नेतेपदाची माळ गळ्यात पडली किंवा स्वताहून पाडून घेतली!
Event Head होणं हे सोपं काम नाही बर का! आणि तुमचा स्वभाव जर स्पष्टवक्ता असेल
तर नक्कीच नाही! काही जणांच्या मते “you should remain diplomatic if you want to
handle people”, पण मला या गोष्टी नाही पटत. असो!!
तर पाहिल्या
दिवासापासून आम्ही झटून काम करायला सुरुवात केली. मी इथे अनेक गोष्टी शिकलो
त्यातील एक म्हणजे की जगातला कोणताही माणूस तुम्हाला कधी उपयोगी पडेल हे सांगता
येत नाही! हळू हळू discussions सुरु झाली. मी याला चर्चा म्हणणार नाही (काही लोकं
म्हणतील सुद्धा), माझ्या मते ते वाद असायचे!! मी कधी debate स्पर्धेत भाग घेतला
नाही पण याठिकाणी मात्र बर्याच debates केल्या (काय करणार! मुळचा स्वभाव जात नाही
म्हणतात!). पण हे नक्की की त्या चर्चा किंवा ते वाद हे केवळ चांगले होईल या
विचाराने केलेल्या असायच्या आणि त्यात कधीच केवळ कुणी मोठा म्हणून त्याचे मत
ग्राह्य धरा असा आग्रहही नसायचा! बर आमच्यात जरी एक final झाले तरी नंतर सगळ्यात
मोठे काम असायचे ते म्हणजे आपली idea, madam ना पटवून द्यायची!! Here you learn
marketing skills! How to sell your idea!!
तयारी करत असताना अनेक स्पर्धा असल्यामुळे आम्ही
वेगवेगळे departments केले होते. आणि हे करत असताना मला ११वी मध्ये शिकलेले
centralization आणि DE-centralization आठवले. Application of what we have
learnt!! खूप
कमी ठिकाणी असे शिकायला मिळत! माझ्यामते अस्तित्व हे एक package आहे!
Pre-management school म्हणू आपण त्याला हवं तर! rules ठरवण्यापासून ते, प्रत्यक्ष
स्पर्धेच्या दिवशी कोण कुठे असणार इतपत तयारी मुले करत होती. हे सगळं करत असताना
मला एके दिवशी एक call आला!. “We would like to sponsor your event, please visit
us for further discussion”, एक नवीन अनुभव, negotiations करण्याचा. मी आणि माझा
मित्र अमेय असे दोघं जण त्यांच्या office मध्ये सुद्धा जाऊन आलो!
खरं तर
तिकडे जाताना, त्यांच्याकडून sponsorship घेऊन यायची आणि हवा करायची असा मस्त plan
डोक्यात शिजला होता. पण तिथे गेल्यावर त्यांच्या अवास्तव मागण्या बघता,
sponsorship ला नाही म्हणायची वेळ आली. पण एक शिकवण नक्कीच मिळाली होती ती म्हणजे,
‘In the business world, people don’t care about your emotions or your
attachment to the particular thing. They are just interested in the benefits
which you give them, in return of what you are expecting from them and one
thing you should remember that if you fail to do so then still they have got
sizable options so basically you are on the loser side’.
खरं तर या लेखात मी आम्ही किती धमाल केली ते
लिहिणार होतो पण आता विषय अर्धवट सोडून थोडंसं विषयांतर करतो!! अस्तित्व ने मला
काय दिलं?? खरं तर अस्तित्व मधून मी फक्त घेतलं, अधाश्यासारखं घेतलं. देणाऱ्याने
देत जावे म्हणतात ना तसं अस्तित्वने सुद्धा त्याच्या परीने द्यायचा प्रयत्न केला.
संघटनेत शक्ती असते हे वारंवार सांगणारा अस्तित्व आणि काही काही कामे केवळ एकटा
माणूसच करू शकतो हे सांगणारा अस्तित्व! अनेक रूपे पहिली या तीन वर्षाच्या काळात या
अस्तित्वची! भरपूर आनंद देणारा अस्तित्व तर कधी frustration देणारा अस्तित्व!
अनेक मित्र देणारा अस्तित्व (इतकेच काय पण अस्तित्व मुळे माझ्या इतर कॉलेज मधल्या
ओळखी इतक्या वाढल्या की participate करणारी मुलं आज चांगले मित्र-मैत्रीण झाले
आहेत.)
अस्तिव
मुळे leadership चे धडे मिळाले. अंगात असलेल्या थोड्याफार नेतृत्व गुणांना योग्य
दिशा मिळाली आणि मुख्यत्वे नेतृत्व करण्याची संधी मिळाली! माझ्या डोक्यात
leadership बद्दल फार वेगळ्या concepts होत्या! त्या पार धुतल्या गेल्या इथे
आल्यावर! अर्थात हे सर्व मी selfish राहून केलं म्हणून शिकला आले हे मी इथे मान्य
करतो! मी प्रत्यक्ष किती अस्तित्वला दिलं हे मला माहिती नाही, कदाचित in return
काही दिलं सुद्धा नसेल! पण एक गोष्ट नक्की आहे की अस्तित्व तुम्हाला एक चांगला
माणूस म्हणून घडवतो! जो याचा उपयोग करून घेतो त्याला फायदा मिळतो आणि उरलेल्यांना
भरपूर फोटो आणि सेल्फी मिळतात (कुणा ठराविक व्यक्तीला टोमणा नव्हता, हा ज्याला
स्वतःला लाऊन घ्यायचा असेल त्याने खुशाल घ्यावं)!!
हा लेख लिहिण्यामागचे कारण म्हणजे आमच्या
madam, नुकताच २०१६ चा अस्तित्व झाला आणि त्यादिवशी संध्याकाळी घरी जाता जाता,
“शंतनू काय तू, एवढं लिहीत असतोस मग अस्तित्व वर का लिहित नाहीस”, इति आमच्या
शिक्षिका. आता प्रवास वर्णन लिहिणारा मी, या अश्या विषयावर कसा लिहिणार. आता हे
चार-लोकांमध्ये सांगितले तर लोकं हसतील म्हणून लिहायला बसलो! यावर्षी प्रमुख
पाहुणे म्हणून श्री. महेश काळे आले होते! हा माणूस सुंदर गातो हे सगळ्यांनाच
माहिती आहे पण त्यांचे narrating skills इतके चांगले असतील असे मला वाटले नव्हते.
त्यांनी बोलता बोलता एक गोष्ट सांगीतली ती अशी की, “आजकाल आपण जे करतो ते
दुसऱ्यांसाठी करतो! शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय पण स्वतःसाठी असे काही कधी काही
करत नाही! त्यामुळे असा एक तरी छंद किंवा कला अंगी बाळगा ज्याने स्वतःला समाधान
वाटेल” आणि त्यांच्याकडे बघताना हे लगेच कळत की हा माणूस आधी करतो मग बोलून
दाखवतो! एकंदरीतच अस्तित्व या कुटुंबाची वाटचाल जोरात चालू आहे. दर वर्षी कमीतकमी
१०० तरी members जोडणारे हे कुटुंब कदाचित पुढे अजून वाढेल! यावर्षी तरी आमचा
officially असा शेवटचा अस्तित्व होता! अर्थात पुढे सुद्धा आम्ही या कुटुंबाचा भाग
राहणार आहोतच!
अस्तित्व बद्दलचा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा
राहून गेला तो म्हणजे तो भारतीय संस्कृती जपण्याचा एक आमच्या परीने केलेला छोटासा
प्रयत्न! नाहीतर आजकाल guitar च्या जमान्यात, सतार वादक कमीच दिसतात. (येथे guitar
ला कमी लेखण्याचा उल्लेख नाही आहे. माझ्या एका मित्राने guitar वर हंसध्वनी वाजवला
होता.) मुद्दा भारतीय संगीत किंवा भारतीय कला लोप होत जाण्याचा आहे! आणि हीच कला
जोपासण्याची संधी अस्तित्व च्या निमित्ताने आतापर्यंत दिली गेली आणि पुढे सुद्धा
दिली जाईल हा विश्वास मला नक्कीच आहे. माझे कॉलेज मध्ये सध्या असलेल्यांना आणि
पुढे येणार्यांना इतकेच सांगणे आहे. या कॉलेजचा, इथे मिळणाऱ्या संधींचा वापर करून
घ्या. एकवेळ १२वी मध्ये ८५% मिळाले चालतील पण सर्व स्पर्धात सहभागी व्हा! बापरे
बरीच बडबड/उपदेश करतो आहे. बोलण्यासारखे खूप आहे खरं बघायला गेलं तर पण आज काल
वाचणार्यांचा पण विचार करावा लागतो त्यामुळे इथेच थांबतो. काही राहिले असेल तर
दुसरा भाग काढून नक्कीच लिहेन. तूर्तास इथेच विश्राम घेतो!!
2 comments
Shantanu, I am happy you have penned your thoughts on ASTITVA. Astitva has given all of us so many experiences and memories and moreover a special identity. Proud of you and your achievements
ReplyDeleteThanks a lot for your kind comments!!!
ReplyDelete