Skip to main content

गद्धेगळ- एक अपरिचित इतिहास


        सह्याद्रीत फिरताना एखाद्या किल्ल्यावर किंवा मंदिरांशेजारी अनेक घडवलेले दगड आपल्या नजरेस पडतात. या दगडांवर अनेक आकृत्या, चिन्हे किंवा लेख कोरलेले असतात. अशा वेळेला कुतूहलाने का होईना पण आपण त्यांचे निरीक्षण करतो. आणि मग काही वेळाने या शिल्पांना विरगळ किंवा गद्धेगळ असे म्हणतात असे कळून येते. विरगळ आणि गद्धेगळ या दोन वेगळ्या गोष्टी. तर लेखात आपण गद्धेगळ बाबत जाणून घेऊ.

     गद्धेगळचा अर्थ काढायला गेलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की, ‘गद्धे’ म्हणजे गाढव आणि ‘गळ’ म्हणजे दगड. इंग्रजी मध्ये सुद्धा याला ‘ass-curse stone’ असे म्हणतात. गद्धेगळ हा स्पष्ट शब्दात सांगायचं तर दिलेली एक शिवी आहे. आता तर ही शिवी कशासाठी? पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या जमिनी दान देण्याची पद्धत होती. जसे त्याकाळचे राजे एखादा किल्ला किंवा मंदीर यांना काही जमीन किंवा त्या गावचे उत्पन्न दान म्हणून देत असत. या दानाचा कुणी अव्हेर केला किंवा गैरवापर केला तर त्यासाठी शापवाणी दिलेली असते. ती शापवाणी किंवा शिवी म्हणजे गद्धेगळ!  हे दान कुणी नाकारील त्याच्या आईला गाढव किंवा घोडा लागेल अक्षरशः असे शब्द उच्चारलेले असतात. १२ व्या, १३ व्या शतकातील काही शिलालेखात “तया माये, गाठोऊ घोडौ झाविजे” असे सुद्धा उल्लेख.  ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते त्यांच्यासाठी मग दगडी शिल्पे कोरली जाऊ लागली.

कर्वेनगर येथील गणेश मंदिरामधील गद्धेगळ 
   आता हे शिल्प ओळखायचे कसे तर साधारण पणे एका दगडावर तीन भागात कोरीव काम केलेले असते. वरच्या भागात चंद्र-सूर्य कोरलेले असतात, याचा अर्थ दिलेला शाप हा चिरकाल टिको. मधल्या भागात दिलेल्या दानाविषयीचा लेख कोरलेला असतो आणि तळाच्या  भागात झोपलेल्या अवस्थेत एका स्त्रीची आकृती आणि तिच्याशी प्रणय करताना गाढव अशा प्रकारची आकृती कोरलेली असते. पण प्रत्येक गद्धेगळ हा तीन भागांचा असेलच असे नाही. काही गद्धेगळ हे आकृती असलेले असतात तर काही गद्धेगळ वर लेख असतो तर काही मात्र तिन्ही भाग असलेले असतात.  
   
     गद्धेगळचा काळ जर आपण काढायला गेलो तर हे साधारण ९ व्या ते १० व्या शतकातील आहेत म्हणजे हे दगड शिलाहारांच्या व यादवांच्या  काळातील असले पाहिजेत असा निष्कर्ष काढू शकतो. कदाचित त्याच्या आधीच्या काळात सुद्धा गद्धेगळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     आता गद्धेगळ सापडणं हे इतकं महत्वाचं का मानलं जाते? तर याच्या मागे मुख्य कारण म्हणजे यासाठी दिलेले दान. एखाद्या महत्वाच्या वास्तुसाठीच हे दान दिले जायचे त्यामुळे ज्याठिकाणी गद्धेगळ सापडतो ते ठिकाण पूर्वीच्या ठिकाणी महत्वाचे असले पाहिजे असा निष्कर्ष काढता येतो. बर्याच वेळेला दिलेल्या छोट्या दानाचा उल्लेख हा शिलालेखांच्यामधून होतो परंतु जर दिलेल्या मोठ्या दानाचा कुणी अव्हेर केला तर त्यासाठी गद्धेगळ उभारला जाते. महाराष्ट्रात अश्या गद्धेगळ फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. अक्षीचा प्रसिद्ध गद्धेगळ, संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिरामधला गद्धेगळ किंवा रतनवाडीमधील गद्धेगळ हे दर्शवून देतात की याठिकाणांना पूर्वी फार महत्व होते.

   बऱ्याच वेळेला असे होते की एखाद्या ठिकाणची वास्तू ही उध्वस्त झालेली असते आणि जर समजा त्या ठिकाणच्या आसपास गद्धेगळ सापडला तर आपण कमीतकमी असा निष्कर्ष काढू शकतो की याठिकाणी एखादे भव्य मंदीर किंवा मोठी वास्तू होती. बरेच जण बोलताना ती गद्धेगळ किंवा ती विरगळ असा उल्लेख करतात तर असा उल्लेख चुकीचा आहे. विरगळ म्हणजे ‘विराचा दगड’ किंवा गद्धेगळ- ‘गाढवाचा दगड’ हे पुल्लिंगी शब्द आहेत. म्हणून तो विरगळ किंवा तो गद्धेगळ हे बोलणं जास्त योग्य. बऱ्याच गद्धेगळ वर शिल्पं कोरलेली आहेत पण काही गद्धेगळ हे शिल्पं आणि लेख यांचे मिश्रण आहे. भिवंडीजवळ चौथर पाडा येथे असलेला गद्धेगळ आणि आक्षीचा गद्धेगळ ही प्रमुख उदाहरणे. आक्षी येथील गद्धेगळावर तर साल सुद्धा कोरलेले आहे ते म्हणजे शके ९३४. म्हणजेच आत्ताच्या काळातील इसवी सन १०१२. या गद्धेगळ ला आत्ता १००४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि हा गद्धेगळ जवळपास १००४ वर्ष उन, वारा पाऊस यांना तोंड देत सक्षमपणे उभा आहे आणि पुढे सुद्धा राहिल यात वाद नाही.
  
    सध्याच्या काळात मात्र यांना कुणी वाली नाही. इतिहासाचा ठेवा हा नेहमीप्रमाणे काळाच्या ओघात नाहीसा होणारे. याची जपणूक व्हायला हवी. सरकारी पातळीवर किंवा तुम्हा-आम्हा प्रवाश्यांना तर तळमळ हवीच पण स्थानिकांमध्ये सुद्धा या ठेव्याची माहिती देणं महत्वाचे आहे. बरेच वेळा गावकरी भोळ्या मनाने या दगडांना शेंदूर फसतात किंवा त्यावरच्या आकृती खरवडून काढतात तर यागोष्टी आधी थांबवायला हव्यात. शेंदूर फसलेल्या अव्स्थेतेतील गद्धेगळचे एक उदाहरण म्हणजे सासवड येथील गद्धेगळ. असे अनेक गद्धेगळ महाराष्ट्रामध्ये आहेत, भले त्यांचे अस्तित्व हे मर्यादित संख्येमध्ये आहे परंतु ते सर्व हुडकून काढून त्यांच्या माहितीचे योग्य रीतीने संकलन करणे हे गरजेची गोष्ट झाली आहे. कदाचित एक लपलेला इतिहास यातून कळू शकेल.  

सासवड येथे सापडलेली गद्धेगळ!! 

काही गद्धेगळ वर आढळलेले शिलालेख-

१.  अक्षी येथील गद्धेगळ वर असलेला शिलालेख-

                                     'जो लोपी तेहासिये मायेसी गाढाऊ घोडू झवे'

2.वसई येथील गद्धेगळ वर असेलला संस्कृत भाषेतील  शिलालेख -

                                    'तस्यां माता गाढभेनं'

संदर्भ- 

१.   Tulpule, S. G. (1963) -  Pracheen Marathi Koriv Lekh. Pune: University of Pune.

२. Mokashi Rupali (2015) - Gaddhegal Stones: An Analysis of Imprecations and Engraved Illustrations: International Journal of Innovative Research and Development. 

३. Mirashi, V. V. (1977) - Inscriptions of the Silaharas (Corpus Inscriptionum Indicarum Vol VI). New Delhi: Archaeological Survey of India. 
Comments

Popular posts from this blog

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –
“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का!३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.
केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …

BIRDS OF MAHARASHTRA

BIRDS OF MAHARASHTRA
I started birding in around June, when i had my new camera (Canon Power shot SX 400). I visited some birding spot near Pune and Pune outskirts and now I am having plenty of documentation on birds. So i just thought of sharing with you through this blog.. You may find interesting my new series of blog  'BIRDS OF MAHARASHTRA'. In this I will try to give information of some birds with pictures taken by me and some taken from the internet..   


Let's start with some simple and common birds..

1) COPPER SMITH BARBET.
IntroductionThe Coppersmith Barbet known by other names like Crimson-breasted Barbet or Coppersmith has the scientific name Megalaima haemacephala is a bird with Grass green color feathers which is a resident of India and other countries of South Asia. About nine subspecies of Coppersmith Barbet is recognized. The other Indian local names of this species are tuktukiya, Basanta and thathera. 
Characteristics:This grass green colored bird with crimson …