Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

मावळ-न्नेर(नेर)

प्रत्येक नावाला काही ना काही अर्थ असतो! इतकेच काय तर गावांच्या नावाला किंवा प्रदेशांच्या नावाला सुद्धा काही ना काही अर्थ असतो! माझ्याच गावाचे उदाहरण घ्या ना! माझे गाव पेण. तर पेण हा शब्द्द ‘पेणे करणे’ या क्रियापदापासून आला! म्हणजे मुक्काम करणे. पूर्वी जेव्हा व्यापारी घाटमार्गे त्यांचा मला नागोठणे किंवा चौल येथील बंदरांकडे घेऊन जात असत तेव्हा पेण मध्ये बऱ्याच वेळेला मुक्काम होत असे! त्यामुळे 'पेणे करणे' यावरून अपभ्रंश होत पेण हे नाव आज आहे. असो!!    अशाच प्रकारचे वेगवेगळे अर्थ घाटावरील गावांनासुद्धा आहे. आता हेच बघा ना, संगमनेर, सिन्नेर, जुन्नेर या सगळ्या गावांच्या मागे न्नेर चिकटले आहे किंवा पुण्यातला अनेक भागात मावळ हा शब्द ऐकायला येतो (मला आधी वाटायचं इथे मावळे जास्त राहत असतील म्हणून या भागाला मावळ म्हणत असतील). तर या प्रकारच्या शब्दांचा काही वेगळा अर्थ आहे का आणि असल्यास तो काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख!!     तर साधारणपणे घाटमाथ्यावरच्या पण कोकण विभागाला जवळ असणाऱ्या प्रदेशाला जिथे नद्यांची खोरी असून तांदळाचे भरगोस पिक येते अशा प्रदेशांना ‘मावळ’ किंवा ‘नेर’ असे म्हणले …

सह्याद्री - माझा गुरु

५ सप्टेंबर!! संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आहे. त्याचबरोबर शिक्षक दिनाचे सुद्धा काही मेसेज फिरत आहेत. म्हणून मग आजचा लेख गणपती वर ना लिहिता एखाद्या गुरु वर लिहावा असा विचार मनात आला!! शालेय जीवनापासून ते कॉलेज लाईफ पर्यंत अनेक गुरु मिळाले. काही मित्रांच्या स्वरूपात तर काही शिक्षकांच्या रूपाने. पण  सर्वांपेक्षा निराळा आणि कदाचित माझ्या आयुष्यात सर्वात वरचे स्थान असलेला गुरु म्हणजे 'सह्याद्री'. सखा सह्याद्री!! स्तुती करायला शब्द कमी पडतील असा माझा व माझ्या सारख्या इतरांचा  सह्याद्री!!

     सह्याद्री ने मला खूप काही दिले. सह्याद्रीने मला प्रेम करायला शिकवले. सह्याद्रीने मला द्यायला शिकवले. सह्याद्रीने मला भव्यपणा शिकवला पण त्याचबरोबर सह्याद्रीने मला सतत जमिनीवर राहायला शिकवले. आज मी जो कोण आहे किंवा जे काही थोडंफार आयुष्यात कमावलंय यात या सह्याद्रीचा भरपूर वाटा  आहे. कदाचित इतरांच्या दृष्टीने तो बेसाल्ट मध्ये बनलेला आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला केवळ पर्वत असेल पण माझ्यासारख्या भटक्याच्या नजरेतून बघाल तर सह्याद्री हा बेलाग आहे…