मावळ-न्नेर(नेर)

 • September 11, 2016
 • By Shantanu Paranjape
 • 6 Comments    प्रत्येक नावाला काही ना काही अर्थ असतो! इतकेच काय तर गावांच्या नावाला किंवा प्रदेशांच्या नावाला सुद्धा काही ना काही अर्थ असतो! माझ्याच गावाचे उदाहरण घ्या ना! माझे गाव पेण. तर पेण हा शब्द्द ‘पेणे करणे’ या क्रियापदापासून आला! म्हणजे मुक्काम करणे. पूर्वी जेव्हा व्यापारी घाटमार्गे त्यांचा मला नागोठणे किंवा चौल येथील बंदरांकडे घेऊन जात असत तेव्हा पेण मध्ये बऱ्याच वेळेला मुक्काम होत असे! त्यामुळे 'पेणे करणे' यावरून अपभ्रंश होत पेण हे नाव आज आहे. असो!!
   
   अशाच प्रकारचे वेगवेगळे अर्थ घाटावरील गावांनासुद्धा आहे. आता हेच बघा ना, संगमनेर, सिन्नेर, जुन्नेर या सगळ्या गावांच्या मागे न्नेर चिकटले आहे किंवा पुण्यातला अनेक भागात मावळ हा शब्द ऐकायला येतो (मला आधी वाटायचं इथे मावळे जास्त राहत असतील म्हणून या भागाला मावळ म्हणत असतील). तर या प्रकारच्या शब्दांचा काही वेगळा अर्थ आहे का आणि असल्यास तो काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख!!
    
    तर साधारणपणे घाटमाथ्यावरच्या पण कोकण विभागाला जवळ असणाऱ्या प्रदेशाला जिथे नद्यांची खोरी असून तांदळाचे भरगोस पिक येते अशा प्रदेशांना ‘मावळ’ किंवा ‘नेर’ असे म्हणले जाते. थोडक्यात म्हणजे मावळतीकडचा प्रदेश. आता उदाहरणे बघायची झाली तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा, मुळशी हा प्रदेश. पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक मावळ आढळतात याचे कारण म्हणजे येथे होणारे तांदुळाचे उत्पादन. श्री राजवाडे यांनी एके ठिकाणी मावळ व नेर यांची यादी दिली आहे. ती यादी खालीलप्रमाणे-

क्रमांक
जिल्हा
मावळ
नेर
१.
पुणे
अंदर(आंध्र), पवन, घोटण, नाणे, गुंजण, कोर बारस, हिरडस व मुसे, मुठे, पौड, भोर, वेलवंड आणि शिवथर ही खोरी
जुन्नेर, शिवनेर, भामनेर, मोन्नेर (मीन्नेर), घोड्नेर, पिंपळनेर,
२.
नाशिक
-
सिन्नेर
३.
नगर
-
पारनेर, अकोळेनेर, संगमनेर
४.
खानदेश
-
जामनेर

    तुम्ही ही यादी बघाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की यातील बहुतेक नावे ही त्या त्या ठिकाणी असणाऱ्या नद्यांच्या नावावरून दिली गेली आहेत. उदाहरणार्थ, मीना नदीचे मीन्नेर, घोड नदीचे घोड्नेर, भीमा नदीचे भामनेर, प्रवरा आणि म्हाळुंगी नदीचा संगम असणारे संगमनेर, आंध्रा नदीचे आंध्राकिंवा आंदर मावळ, पवना नदीचे पवन, इंद्रायणीच्या काठी असणाऱ्या नाणे गावाचे नाणे मावळ, मुसा नदीचे मुसे खोरं, तीच बाब गुंजवणे, वेळवंड यांची, नीरा नदीचे हिरडस मावळ. कोर- बारस हे मावळ तिकोन्या जवळचे कोळवण आणि कोरीगड यांच्या मध्ये आहे. कोर बारस हे नाव त्याठिकाणी राहणाऱ्या कोरी जातीच्या कोळ्यांच्या नावावरून दिले गेले असावे.

   आता घाटमाथ्याच्या जवळ, विपुल पर्जन्य असणारा प्रदेश, नदीचे खोरे किंवा तांदुळाचे उत्पादन होणारा प्रदेश या सगळ्याचा विचार करायला गेलं तर नेर ही संज्ञा यातील काही गावांना लागू होत नाही. उदाहरण घ्यायचं झाले तर संगमनेर व पारनेर ही गावे घाटमाथ्याच्या जवळ नाहीत किंवा, सिन्नेर व संगमनेर येथे विपुल पर्जन्य नाही, जामनेर, शिवनेर यांचा संबंध कोणत्याही नदीशी लावता येत नाही, कारण जुन्नरच्या लगत मीना व कुकडी या दोन नद्यांची खोरी आहेत. मीनेला तिचे स्वतंत्र नेर आहे आणि समजा जुन्नर हे कुकडीचे नेर मानले तर शिवनेरला कोणतीही नदी उरत नाही. सिन्नर, पिंपळनेर, जामनेर अकोलेनेर या नावांचा संबंध तेथे असणाऱ्या ठिकाणांच्या नावाने लावता येतो पण नेर आणि मावळ यांचा अर्थसा बघायला गेलं तर या गावांना तो लागू होत नाही.
  
   शिवकालातल्या सरदारांना मावळे असे संबोधत असत. कदाचित या मावळ प्रदेशात राहणारी माणसे म्हणून मावळे असे सुद्धा म्हणत असावेत. पण जर हा तर्क वरील ४-५ नेरांना लावायला गेलं तर लागू होत नाही. कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात हे प्रामुख्याने पुणे परिसरातून केली होती आणि त्यांना लढवय्ये असलेल्या मावळ्यांची साथ सुद्धा याच परिसरातून लाभली होती. सिन्नर, संगमनेर, जामनेर ही गावे या प्रदेशापेक्षा भरपूर लांब आहेत आणि नेर किंवा मावळ यांच्या व्याख्येत सुद्धा न बसणारी आहेत तर मग प्रश्न असा येतो कि या गावांना नेर या संज्ञेत धरावे का कारण अशी गावे जर आपण धरत गेलो तर मग आपल्यासमोर असेल ती नेरांची फुगलेली संख्या आणि मग नेर-मावळ या दोन शब्दांचे नाविन्य निघून जाईल आणि त्या शब्दांना फारसे महत्व उरणार नाही. 

   महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत ज्यांना वेगवेगळे अर्थ, त्या गावांमधील परंपरा, त्या गावांचा इतिहास वेगळा आहे. त्यामुळे जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्याचबरोबर त्याला देणे आवश्यक आहे!!      

  
तुंग 

विपुल पर्जन्यमानाचा प्रदेश- पवन मावळ  

पवना नदीवरील पवना धरण 

You Might Also Like

6 comments

 1. छान१ ’नेर’ ह्या विशेषणामागचा इतिहास आज प्रथमच कळला. धन्यवाद.

  ReplyDelete
 2. कदाचित नेर शब्द तेवढ्या परीसराच्या जमीनदाराच्या गावाला जोडला जात असेल.
  मी जामनेरचा आहे, माझे आजोबा जामनेरचे जहागिरदार होते.
  शहाजीराजे सिन्नरचे होते, लगान मध्ये 'चंपानेर के राजा' होते!

  ReplyDelete
 3. कदाचित नेर शब्द तेवढ्या परीसराच्या जमीनदाराच्या गावाला जोडला जात असेल.
  मी जामनेरचा आहे, माझे आजोबा जामनेरचे जहागिरदार होते.
  शहाजीराजे सिन्नरचे होते, लगान मध्ये 'चंपानेर के राजा' होते!

  ReplyDelete
 4. कुकडनेरचा उल्लेख केला नाही

  ReplyDelete
 5. कुकडनेरचा उल्लेख केला नाही

  ReplyDelete
 6. उपयुक्त माहिती धन्यवाद

  ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });