Skip to main content

Posts

Showing posts from January, 2017

कुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात??

पानिपत प्रकरणाबद्दल वाचायला लागल्यानंतर हे लक्षात आले की नुसते युद्ध अभ्यासून चालणार नाही कारण पानिपतचे युद्ध होण्याची कारणे ही अनेक आहेत. पानिपत हे अटळ होते फक्त ते लांबवर ढकलेले इतकेच. पानिपतचे युद्ध होण्यास एक महत्वाची घटना कारणीभूत ठरली ती सदाशिवराव भाऊं यांनी केलेला कुंजपुरावरील हल्ला!! मागच्या ब्लॉग मध्ये “भाऊका घोडा” या वाक्प्रचारात कुंजपुराचा उल्लेख आला होता तर त्याबद्दल माहिती देण्यासाठीच या लेखाचा प्रपंच!
    भाऊंनी दिल्ली काबीज केली आणि दिल्ली ते कुंजपुरा हा पट्टा आपल्या ताब्यात राखण्याचे प्रयत्न चालू केले. भाऊंचा इरादा असा होता की पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून अब्दालीस घेरून त्याला मध्ये चेपायचे. अब्दालीच्या दक्षिणेस असणाऱ्या यमुना नदीने त्याचा दक्षिणेकडे येणारा मार्ग अडवला होता. त्यामुळे भाऊ यांना इकडे हालचाली करायला वाव मिळत होता. त्यामुळे जर आग्रापासून कुंजपुरा हे गाव जर ताब्यात घेतले तर अब्दाली यमुना नदी ओलांडूच शकणार नाही अशी परिस्थिती. पूर्वेकडे असणाऱ्या गोविंदपंताना मदत पाठवून पूर्वेकडून अब्दालीवर दबाव टाकणे हा एक पर्याय भाऊंच्याकडे होता पण यमुना नदीमुळे ते शक्य…

ती सध्या काय करते!!

उशीशेजारी ठेवलेला मोबाईल अचानक वाजला !! Whats App वर एका अनोळखी माणसाकडून मेसेज आला होता! (तात्पुरते त्या अनोळखी माणसाला X म्हणूया ) मनोजने सर्व ग्रुप पहिले पण हा नंबर कोणत्याच ग्रुप मध्ये नाही सापडला! इतक्या रात्री कुणी मेसेज केला या विचारात मनोज पडला होता!! पण त्याने रिप्लाय द्यायचे ठरवले!!  X : Hi!!  मनोज: नमस्कार (मराठीमध्ये बोलायची फारच सवय असते काही काही लोकांना)
X: मी अश्विन साठे! (चला त्या अनोळखी माणसाचे नाव तर कळले होते) मनोजच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली!! इतके महिने तो ज्यामुलीवर प्रेम करत होता त्या मुलीचा तो यार होता!! मनोज अचानक चमकला की या माणसाकडे आपला नंबर कुणी दिला असेल!! शिवानी!! तिनेच दिला असणार हा नंबर!! काय गरज होती द्यायची?? ५ दिवसांपूर्वीच शिवानीसोबत  भांडण झाले होते आणि गेले ५ दिवस ही आग तशीच धुमसत होती. मनोजला वाटले थांबेल काही दिवसांनी आपोआप!! पण आज तर हद्दच झाली!! तरी सुद्धा मनोजने मेसेजला उत्तर द्यायचे ठरवले!! बघूया काय होतंय ते!! एकदाचा सोक्षमोक्ष लागूदे!!
मनोज: नमस्कार (पुन्हा एकदा, खरे सांगायचे तर मनोज रिप्लाय द्यायला वैतागला होता )!! 
अश्विन: मला थोडे …

पानिपतानंतर रूढ झालेले वाक्प्रचार

पानिपताने मराठा साम्राज्याला काय दिले यावर अनेक जणांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात फायदा झाला आणि काही जण म्हणतात तोटा झाला. ते काहीही असो पण पानिपताने मराठी भाषेला खुप फायदा झाला. कसा म्हणताय? अहो अनेक वाक्प्रचार जनमानसात रूढ झाले आणि ते रोजच्या वापरत सुद्धा वापरले जाऊ लागले. त्यातील काही ‘सदाशिवरावभाऊ’ यांच्याबद्दल असणारे वाक्प्रचार हे पानिपत येथे राहणाऱ्या लोकांनीच वापरायला सुरुवात केली.
पानिपत झाले/पानिपत होणे: हा वाक्प्रचार तर पानिपत झाल्यानंतर खूपच प्रचलीत झाला. पानिपतात झालेला मराठ्यांचा संहार आणि पराभव यांमुळे ‘पानिपत होणे’ म्हणजे पराभव होणे किंवा नष्ट होणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग रूढ झाला.
विश्वास तर गेला पानिपतात : पानिपतात विश्वासरावांचा दुर्दैवी अंत झाला. तर त्यासंदर्भात या वाक्यप्रयोग केला जातो. समजा एखाद्याने म्हणले की तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा "विश्वास पनिपतातच तर गेला" असा शब्दप्रयोग सुरु झाला.
भाऊकी लूट:
हा वाक्प्रयोग तेव्हा वापरण्यात येतो जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या मनुष्याकडे एखादी वस्तू फुकट मागू लागतो. ज्याव्यक्तीकडे ही वस्तू मागण्यात येते त…

पानिपतात झालेले अब्दालीचे नुकसान

आजच्याच तारखेला काही वर्षांपूर्वी भारत इतिहासातला एक मोठ युद्धसंग्राम झाला आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. पण या युद्धात मराठे प्राणपणाने लढले आणि अमर झाले. गोविंदाग्रज अर्थात रा.ग.गडकरी यांनी पानिपतचे यथार्थ वर्णन केले आहे ते असे,
कौरव पांडव संगर तांडव द्वापारकाली होय अति तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती
इतिहासकार ग्रॅण्ट  डफ हा मराठा सैन्याचे वर्णन करताना लिहितो की, 
"The lofty and spacious tents, lined with silks and broad cloths, were surmounted by large gilded ornaments, conspicuous at a distance... Vast numbers of elephants, flags of all descriptions, the finest horses, magnificently caparisoned ... seemed to be collected from every quarter ... it was an imitation of the more becoming and tasteful array of the Mughuls in the zenith of their glory."  [संदर्भ-  The fall of the Mughal Empire of Hindustan- Chapter VI] 
पानिपतचे युद्ध हे अद्भुत आहे. परकीय साम्राज्याने भारतावर आक्रमण करू नये म्हणून सह्याद्रीने देशासाठी केलेला त्याग असेच मी त्याचे वर्ण…

बाळाजी विश्वनाथ भट

खरं तर मी इतिहासाचा फारसा अभ्यासक नाही पण फेसबुकवर एके ठिकाणी बाळाजी विश्वनाथ यांच्या कर्तृत्वावर बोट ठेवले गेले म्हणूनच काही गैरसमज दूर करण्यासाठी हा प्रपंच!!    बाळाजी हा माणूस कोकणातील एक सामान्य भिक्षुकी करणारा माणूस आणि जंजीऱ्याच्या सिद्दीने घर बुडवले म्हणून घाटावर गेला आणि अचानक केवळ नशीबाने पेशवेपदी चढला असा गोड गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. म्हणजे शाहू महाराजांना माणसांची पारख नव्हती असा अप्रत्यक्ष आरोप केला जातो?!! मुळातच माणसांची पारख कशी करावी हे छत्रपती शिवाजी राजांनी दाखवून दिले होते आणि तोच वारसा पुढे शाहू राजांनी चालवला!! बाळाजी यांचे पद हे सर्वस्वी त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या अंगी असणारे असामान्य गुण यांमुळे मिळाले आहे कारण स्वराज्यात केवळ हुशारी आणि राष्ट्राबद्दल असणारी निष्ठा या दोनच गोष्टी महत्वाच्या होत्या.    केवळ आडनाव भट म्हणून हा माणूस भिक्षुकी करत होता असाही एक गैरसमज असतो! हसू का नको तेच कळत नाही. उलट मी म्हणेन भट या शब्दाचा अर्थ वीरपुरुष असा होतो आणि बाळाजीच्या घराण्याने हे सार्थ करून दाखवले. बाळाजीचे पूर्वज हे हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन या दोन गावाचे देशमुख…

प्रिय गडकोट (पत्र किल्ल्यांना)- A letter to all forts!!

प्रिय गडकोट,
खूप दिवसांनी पत्र लिहायला बसलोय खरं पण बोलण्याइतके सुद्धा खूप आहे त्यामुळे आजचे पत्र हे तुम्हा सर्व किल्ल्यांना!! तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागेल खरा पण माझा पण नाईलाज आहे!! घटनाच अशा काही घडल्या आहेत की तुम्हाला कळवल्या वाचून राहवलं नाही आणि तडक लिहायला बसलो!
इतके दिवस मी काय किंवा आणखीन माझ्यासारखे ट्रेकर काय, तुम्हाला इतिहासाचे एक महत्वाचे साधन म्हणून बघत होतो. दर रविवारी यायचे, कष्ट करून वर चढायचे आणि मग दिवसभर तुमच्या अंगा खांद्यावर मनसोक्त हिंडायचे ते सुद्धा शिवरायांच्या इतिहासाची उजळणी करतच!! वाटेत एखादा पक्षी किंवा फुलपाखरे दिसले की सुरु व्हायचा तो निसर्गाचा तास!! आजवर तुम्हाला दिलेल्या प्रत्येक भेटीने काहीतरी नवीन शिकवले आणि तुमच्यामुळेच मनातले लहान मुल कायम राहिले!! पावसाळ्यात वाटेत एखाद्या डबक्यात जोरात उडी मारून ते पाणी बाकीच्यांच्या अंगावर उडवायचा खोडकरपणा सुद्धा तुमच्यामुळेच घडायचा!! पण दुर्दैवाने आता मात्र तसे घडत नाही हो!!
त्यादिवशी हरिश्चंद्रासारखा युगपुरुष पण माझ्याजवळ ढसाढसा रडला हो!! कोकणकड्यावर बसून त्याचे ते अनुभव ऐकत मन विषण्ण झाले!! सांगत होता, “…

The Great Mississippi Bubble - Part 5

From part 4


Now the interesting story starts       25 years’ lease was given to this company to develop French territories and the Mississippi in North America. It was a clear license to exploit the rich territory of Mississippi as it was watered by the Mississippi river. The deal required that 6000 French citizens and 2000 slaves were required to be settled in the territory. This was not enough as the company was given a monopoly for growing tobacco and selling of tobacco also.  Sweet!
     The company became known widely as Mississippi Company. Earlier its stock was bought only with the down payment of 10%. Rumors were spread that, a beggar who invested the saving in this scheme, made 70 million livres when he cashed out.  Later John Combined his bank and Mississippi Company and he changed the name of the Bank from ‘Banque General’ to ‘Banque Royal’. Duke d’Orleans bought the stakeholders in the bank and made it the royal institution with sole stakeholder. Soon notes of Bank Royal wer…