ती सध्या काय करते!!

  • January 17, 2017
  • By shantanu paranjpe
  • 0 Comments

                         

उशीशेजारी ठेवलेला मोबाईल अचानक वाजला !! Whats App वर एका अनोळखी माणसाकडून मेसेज आला होता! (तात्पुरते त्या अनोळखी माणसाला X म्हणूया ) मनोजने सर्व ग्रुप पहिले पण हा नंबर कोणत्याच ग्रुप मध्ये नाही सापडला! इतक्या रात्री कुणी मेसेज केला या विचारात मनोज पडला होता!! पण त्याने रिप्लाय द्यायचे ठरवले!! 
X : Hi!! 
मनोज: नमस्कार (मराठीमध्ये बोलायची फारच सवय असते काही काही लोकांना)

X: मी अश्विन साठे!
(चला त्या अनोळखी माणसाचे नाव तर कळले होते) मनोजच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली!! इतके महिने तो ज्यामुलीवर प्रेम करत होता त्या मुलीचा तो यार होता!! मनोज अचानक चमकला की या माणसाकडे आपला नंबर कुणी दिला असेल!! शिवानी!! तिनेच दिला असणार हा नंबर!! काय गरज होती द्यायची?? ५ दिवसांपूर्वीच शिवानीसोबत  भांडण झाले होते आणि गेले ५ दिवस ही आग तशीच धुमसत होती. मनोजला वाटले थांबेल काही दिवसांनी आपोआप!! पण आज तर हद्दच झाली!! तरी सुद्धा मनोजने मेसेजला उत्तर द्यायचे ठरवले!! बघूया काय होतंय ते!! एकदाचा सोक्षमोक्ष लागूदे!!

मनोज: नमस्कार (पुन्हा एकदा, खरे सांगायचे तर मनोज रिप्लाय द्यायला वैतागला होता )!! 

अश्विन: मला थोडे बोलायचे होते!! (बरे झाले लगेच विषयावर आला, नाहीतर उगाच पाल्हाळ लावत बसतात लोकं )

मनोज: हम्म!! (मनोज पुण्याचाच त्यामुळे थोडं तिरसट बोलणे हे आलेच!! )

अश्विन: मला शिवानीबद्दल बोलायचे होते... (बोल बाबा काय बोलायचे ते)

मनोज: तू जे काही बोलणार आहेस, ते मला माहिती आहे, (आता उगाचच अश्विनचा राग यायला लागला होता)

अश्विन: हे बघ, मनोज.. तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही आहे!! 

मनोज: आपण तर भेटलो पण नाही तर गैरसमज कशाला?? मी तर तुला ओळखत पण नाही!! (परफेक्ट!! ऍग्रेशन दाखवायला हवं!!)

अश्विन: जरा स्पष्टच बोलतो, शिवानी पासून लांबच रहा!! (हा कोण सांगणारा?? आता शिवानीचा प्रचंड राग)

मनोज: मी तर तिच्याशी आयुष्यात बोलणार नाही आहे!! त्यामुळे लांब काय आणि जवळ काय!! 

अश्विन: हे बघ दादा!! लांब राहा याचा अर्थ बोलू नकोस असे नाही!! पण तुझ्यामुळे उगाचच आमच्यात भांडणे आणि गैरसमज होत आहेत. (आता तर हद्दच झाली!! आपल्यामुळे भांडणे?? मनोज तर बेक्कार उचकला! या माणसाला आपण ओळखत सुद्धा नाही आणि हा शहाणा म्हणतोय की तुझ्यामुळे आमच्यात भांडणे!! तुम्हाला नीट सांभाळता येत नाही तुमचे प्रेम प्रकरण त्याला मी काय करू???)

मनोज: माझा काय संबंध?? मी कधी तुमच्यात आलो?? (कुठल्या कुठे आपण हे बोललो हे मनोजला वाटले)

अश्विन: तुला जेवढं सांगितले तेव्हडे तू ऐकशील असे मला वाटते!! मित्र आहेस, मित्र म्हणूनच रहा!! (आता पारा फारच वर चालला होता!! तरी मनोजने शांत राहायचे ठरवले)

मनोज: ठीक आहे!

अश्विन: चिडू नकोस!! पण ती माझ्यावर प्रेम करते आणि तुझ्या तिच्यावर प्रेमकरण्यामुळे आमच्यात उगाचच भांडणे होत आहेत!! तेव्हा कृपा कर आणि लांब राहा!! (धमकी??? त्याला त्याची औकात दाखवून द्यावी असा विचार मनोजच्या मनात यायला लागला!! पण त्याने  साध्य काय होईल? नकोच त्यापेक्षा!! माघार घेऊन गप्प  बसावे!! एका अर्थी अश्विन सुद्धा बरोबर आहे, पण शिवानीला दणका द्यायला हवा!! मैत्री आणि प्रेम या दोन गोष्टी वेगळ्या असतात हे मनोज विसरलेला! पण ते म्हणतात ना प्रेमात जग आंधळे होते आणि डोक्याने विचार करणे सोडून दिले जाते!!)
________________________________________________________________________________

(दुखावलेला मनोज आता अश्विनीला मेसेज करतो) 

मनोज: अश्विनला माझा नंबर कुणी दिला?? (अगदी मूर्खपणाचा प्रश्न, पण बोलणे सुरु कसे करणार??)

शिवानी: मी!! (अपेक्षित असलेले उत्तर!!) 

मनोज: काय गरज होती???!!

शिवानी: गरज म्हणजे?? त्याने मागितला मी दिला!! आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे!! मी त्याला नंबर देईन नाहीतर काहीही करेन !!

मनोज: गरज काय आहे पण?? तू स्वतः माझ्याशी बोलली असतीस तर प्रकरण संपवले असते कायमचे!! त्याला मध्ये खेचायची काय गरज??!

शिवानी: हे बघ!! आपण आधी सुद्धा याविषयावर खूप वेळा बोललो आहे!! तू ऐकत नाहीस त्याला मी काय करू??

मनोज: :( (हे एक सोपे असते! काही सुचले नाही की स्माईली  टाकून द्यायची, फरक काही पडत नाही पन विचार करायला वेळ मिळतो!)

मनोज: (बराच वेळ रिप्लाय आला  नाही म्हणून) पण माझ्या काही अपेक्षाच नव्हत्या तर मी मध्ये येण्याचा काय संबंध?? (उगाचच, माझ्या काही अपेक्षा नव्हत्या म्हणून, मनोजने आपण जगापेक्षा वेगळे प्रेमवीर आहोत असे दाखवायचा प्रयत्न केला)

शिवानी: पण कशाला हे प्रेम वगैरे!! नुसता राहा ना मित्र बनून!! (हल्ली याला फ्रेंडझोन करणे असे म्हणले जाते!! तशीच फिलिंग मनोजला यायला लागली होती)  

मनोज: बरं!! पण माझ्या प्रेम करण्याचा तुला काय त्रास??

शिवानी: तू वेडा आहेस का? आपल्यात काही होणार नाही आहे पुढे, आणि मी अश्विनवर प्रेम करते मनापासून! त्यामुळे तू लांब राहिलेलंच आमच्यासाठी आणि तुझ्यासाठी चांगले असेल!! 

मनोज: माझ्या चांगल्याचा तू काय विचार करतेय??

शिवानी: तुला समजत नाही आहे!! सगळी चूक माझीच आहे!! आधीच विरोध केला असता तर एवढं  झाले नसते! पण आता मला माझीच चूक कळली आहे, त्यामुळे यापुढे मीच बोलणार नाही आहे !!

मनोज: तू कशाला चुकीची!! (आता तर मीच तुझ्याशी बोलणार नाही आहे) मला पण आता संबंध ठेवायची इच्छा नाही आहे!! तू आणि  तुझा तो!! काही लागली मदत तर बिनधास्त हाक मार...  (हे बोलायला आज काल नवीन शिकला होता, असे बोलले की मी किती भारी असे दाखवता येते पण अश्विनीने याला भीक सुद्धा घातली नाही )        

_________________________________________________________________________________
          

इकडे अश्विनचे चार-पाच मेसेज आले होते.. त्यांना रिप्लाय द्यावा का नाही  असा एक छोटासा प्रश्न मनोज समोर होताच!! पण नुसतंच  गुड नाईट म्हणून फोन बंद करणे त्याने पसंद केले. आता कुणाशीच बोलायचे नाही म्हणून मनोजने नेट बंद करून टाकले. थोडा वेळ तसेच अंधारात छताकडे बघण्यात मनोजचा वेळ गेला आणि अचानक डोळ्यातून पाणी टपकले.. झोप लागेना म्हणून त्याने कानात बोळे टाकून गाणी ऐकायला सुरुवात केली तर पहिलंच गाणे लागले होते, "वो लम्हे वो बाते कोई ना जाने"!!    

_________________________________________________________________________________

या गोष्टीला आता ८-१० महिने गेले असतील!!! पण मनोजच्या मनात आठवणी कायम आहेत!! तेव्हापासून दोघांनी जे बोलणे सोडले ते आजपर्यंत!! मधून मधून हाय वगैरे होत असते पण ते फारच कृत्रिम असते!! दोघांच्या आयुष्यत काय चालले आहे हे कुणालाच माहिती नाही. मनोजच्या मनात चुकल्याची भावना अजूनही आहे पण बोलायला सुरुवात तरी कशी करावी हे त्याला अजूनही समजत नाही!! कदाचित अपराधी वाटत असावे!! संबंध जवळपास तुटल्यासारखेच आहेत. ४ वर्षांची मैत्री, प्रेम नावाच्या एका जंतूने संपवली!!  

अजूनही मनोजला तिची आठवण येते. काय करणार केलेलं प्रेम संपत नाही म्हणतात ना ते असे!! सरतेशेवटी मनोजच्या मनात एकंच प्रश्न येतो!! ती सध्या काय करते!!!!!!?? 

(या घटनेतील सर्व पात्रे की काल्पनिक आहेत आणि त्यांचा वास्तव जगाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });