Skip to main content

Posts

Showing posts from February, 2017

कोल्हे दर्शन- योगेश पुराणिक

फॉक्स पुरची मँगो वुमन..म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाईचे राहणारे श्रेयस आणि सागर, कछच्या रणचा राहणारा आशिष आणि पुण्यनगरीतील मी, असे एका शनिवारच्या सकाळी कोह्याच्या दर्शनार्थ निघालो सासवडला. पावसामुळे धरित्री ने एकदम हिरवा शालू नेसलेल्या अशा माळरानात आम्ही पोहोचलो . डावीकडे 3-4 ग्रे फ्रांकॉलिन उर्फ तितर दिसल्या. मस्त light पडला होता त्यांच्या बॅकग्राऊंडला सुंदर अशी पांढरी फुले होती. खूप छान फ्रेम्स मिळाल्या आणि आम्ही पुढे निघालो.

    लांबूनच आशिषला कॅमेऱ्यातून दिसले कि एक इगल एका डोंगराच्या कपारी वर असलेल्या फांदी वर बसलेला आहे. आम्ही साधारण अर्धा किमी फिरून हळू हळू त्याला approach केलं. आम्हाला पाहून त्याने उडू नये म्हणून हळू हळू दोघे दोघे झाडाच्या मागे लपून छपुन पुढे जात होतो. ते करत असतानाच पक्षी कुठला आहे हे ओळखण्यासाठी फोटो काढले. हि पक्ष्यांचे फोटो काढतांनाची पद्धत असते, जेणेकरून जरी पक्षी उडाला तरी आपल्याकडे त्याची नोंद/documentation राहते. फोटो पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की तो twany eagle होता. इथे एक टीप सांगतो की कॅमेरा अथवा दुर्बिणीतून साधारण पक्षी कुठे पाहतो आहे हे बघायचे…

मृत माणसाला लग्नाचे निमंत्रण

जिवंत माणसाला लग्नाचे निमंत्रण देतो हे ऐकले होते पण मेलेल्या माणसाला सुद्धा लग्नाचे निमंत्रण?? ऐकून विचित्र वाटले ना? साहजिक आहे पण अशा प्रकारचे उदाहरण इतिहासात दिसून येते. पारसनिस संग्रहातील कागदपत्रे वाचताना शेजवलकर यांना याचा शोध लागला आणि पुढे त्यांनी ते डेक्कन कॉलेजच्या बुलेटीन मध्ये प्रसिद्ध केले.
  शेजवलकर लिहितात,” कागदपत्रे तपासतात अचानक हळद लावलेले एक पत्र आमच्या नजरेस पडले. जरी ते सध्या कागदावर लिहिले होते तरी आम्हाला लगेच कळून आले की ती लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे. ती पत्रिका ही यजमान घरातील मृत व्यक्तीला आहे हे लगेच कळून आले.” सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांच्या धर्मपत्नी आनंदीबाई यांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजे प्रतापसिंहाच्या लग्नासाठी ही पत्रिका लिहिली होती. प्रतापसिंह यांचे लग्न हे रामचंद्रराव मोहिते यांच्या बहिणीशी ठरविण्यात आले होते. लिहिलेली पत्रिका ही कै. रामराजे यांना उद्देशून लिहिली होती असे दिसून येते. प्रतापसिंह यांचे लग्न रामचंद्रराव मोहिते यांच्या दोन्ही बहिणींशी करण्यात आले होते. अर्थात मोठी बहीण वारल्यानंतरच हे दुसरे लग्न करण्यात आले. ही अशी पद्धत सर्वच …

पाउस सगळ्यांचाच असतो

पाउस सगळ्यांचाच असतो

तो तुझा असतो तो माझा असतो झाडाच्या पानावर अलगद पडलेल्या त्या थेंबांचा असतो पाउस सगळ्यांचाच असतो
तो गडगडणाऱ्या ढगांचा असतो बेभान वाऱ्याचा असतो बेभान वाऱ्यात भिरभिरणाऱ्या मनाचा असतो पाउस सगळ्यांचाच असतो
तो गंधीत धरणीचा असतो फुटणाऱ्या कोवळ्या पानाचा असतो वाट पाहणाऱ्या चातकाचा असतो पाउस सगळ्यांचाच असतो
असा हा पाउस सगळ्यांचाच असतो जो त्याला आपलेसे मानतो त्यांचा असतो जो मानत नाही त्याचा असतो तुम्हा आम्हा सर्वांचा असतो असा हा पाउस सगळ्यांचाच असतो

-शंतनु परांजपे पुणे, ३०/१२/२०१६