पाउस सगळ्यांचाच असतो

  • February 01, 2017
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments
पाउस सगळ्यांचाच असतो


तो तुझा असतो तो माझा असतो
झाडाच्या पानावर अलगद पडलेल्या
त्या थेंबांचा असतो
पाउस सगळ्यांचाच असतो

तो गडगडणाऱ्या ढगांचा असतो
बेभान वाऱ्याचा असतो
बेभान वाऱ्यात भिरभिरणाऱ्या मनाचा असतो
पाउस सगळ्यांचाच असतो

तो गंधीत धरणीचा असतो
फुटणाऱ्या कोवळ्या पानाचा असतो
वाट पाहणाऱ्या चातकाचा असतो
पाउस सगळ्यांचाच असतो

असा हा पाउस सगळ्यांचाच असतो
जो त्याला आपलेसे मानतो त्यांचा असतो
जो मानत नाही त्याचा असतो
तुम्हा आम्हा सर्वांचा असतो
असा हा पाउस सगळ्यांचाच असतो


-    शंतनु परांजपे
पुणे, ३०/१२/२०१६  


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });