Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

सातवाहनांच्या इतिहासाची साधने

मागच्या लेखात आपण सातवाहन आणि आंध्र यांच्याबद्दल थोडीफार चर्चा केली आणि लेख संपवताना मी म्हणालो की पुढच्या भागात राजघराण्याविषयी लिहेन. पण हे सर्व लिहिण्याआधी सातवाहनांच्या इतिहासाची साधने कोणती याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. कारण त्या शिवाय आपल्याला सातवाहन कळणार नाहीत आणि मग या राजाचा संदर्भ कुठून आला वगैरे प्रश्न उपलब्ध होतील. जी अत्यल्प साधने आपल्याकडे आज उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून मग सातवाहन यांच्याविषयी काही तर्क आपण मांडू शकतो.
सातवाहनांच्या इतिहासाची साधने जर आपण पाहायला गेलो तर त्यात मुख्यत्वे, लेण्यांमध्ये असणारे ब्राह्मी लिपीतील शिलालेख, विविध सातवाहन राजांची आढळणारी नाणी, हल सातवाहन राजाने लिहिलेली गाथा सप्तशती आणि विविध पुराणातील सातवाहन राजांचा उल्लेख एवढीच काय ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. अर्थात पुराणात पण कालावधीनुसार बदल होत गेले त्यामुळे पुराणे किती ग्राह्य धरणार हा प्रश्न राहतोच पण तो मुद्दा तात्पुरता आपण बाजूला ठेवू . लेण्यांमधील ब्राह्मी शिलालेख-ब्राह्मी लिपी आणि तिच्या उगमाबद्दल बोलायचे झाले तर तो वेगळा विषय होईल त्यामुळे विस्तारभयास्तव या लेखात बोलणे ट…

कंपासपेटी

कदाचित कंपासपेटी हा शब्द ऐकायला जरा विचित्र वाटतो, त्याचं कारण म्हणजे हल्ली लोकं पाऊच वापरतात आणि मी सेमी मधला असल्याने सगळे शब्द अर्धवट करायची सवय आहे, त्यामुळे सध्या तरी कंपासपेटीच म्हणूया!! तर आमच्या शालेय जीवनातील हा एक अविभाज्य घटक!! ज्या वस्तूशिवाय आपले बालपण कधीच पूर्ण झाले नसते!! मला अजूनही आठवतं आहे, आमच्याइथे भगवानदास नावाचे एक दुकान होते, कदाचित गावातील शाळेच्या गोष्टी मिळणारे एकमेव दुकान! तर पहिली दुसरीत असताना सगळ्यांच्याकडे त्या प्लास्टिक च्या कंपासपेट्या असायच्या.. त्यात पण वेगवेगळे प्रकार असायचे! त्यादिवशी मला वह्या घ्यायच्या होत्या म्हणून दुकानात गेलो होतो तर तिथे अगदी नवीन कोऱ्या पेट्या मांडून ठेवलेल्या होत्या आणि माझ्याकडे जी होती त्यात जेमतेम २-३ पेन्सिली, एखादी पट्टी, खोडरबर आणि टोकयंत्र इतकाच काय ते मावायचं.. खरं तर याच गोष्टी भरपूर झाल्या पण शाळेत सुद्धा डबल डेकर कंपासपेटीची क्रेझ आली होती, त्यामुळे अस्मादिकांकडे पण त्याच प्रकारची पेटी आली. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत नेऊन हवा करायची असे ठरवले.
    घरी आल्यावर ती व्यवस्थित भरली! कंपासपेटी भरायची सुद्द्धा एक कला असते..…

सिधम सातवाहनस!!!

महाराष्ट्रातील लेणी पहिली की पहिले नाव ऐकायला मिळते की ही लेणी सातवाहन कालीन आहेत आणि मग प्रश्न पडतो की हा सातवाहन नक्की कोण? तो कुठे होता? त्याच्या बद्दल काय काय माहिती उपलब्ध आहे? त्याचे कार्य काय?. असे असंख्य प्रश्न मनात ठेवत आपण ती लेणी पाहत असतो, तिथे असलेले अगम्य भाषेतील शिलालेख बघत असतो, भगवान बुद्धाची मूर्ती बघून एक जुनी वास्तू पाहिली या आनंदात घरी जातो तरी ते प्रश्न काही पिच्छा सोडत नाहीत. या सर्वांची उत्तरे मिळवण्यासाठी या लेखाचा प्रपंच!!
सध्याच्या घडीला आपल्याला माहिती असलेला महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहनांपासून सुरु होतो!! त्याच्या आधी महाराष्ट्रात काय झाले याची काहीच माहिती आपल्या दुर्दैवाने उपलब्ध नाही. तर, सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला राजवंश आणि म्हणूनच याचा अभ्यास करणे हे जास्त महत्वाचे ठरते. मग त्याच्या आधी महाराष्ट्र नव्हता का? तर याचे उत्तर होता असे होते. लेण्यातील काही लेखांमधून आपल्याला त्या काळी असलेल्या रठीक, भोजक अशा लहान सरंजाम सत्ताधार्यांची माहिती मिळते. पण सातवाहनांच्या इतिहासापासून आपल्याला महाराष्ट्र कसा होता, इथले सामाजिक जीवन कसे होते, व्यापार कसा …

शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल सभासद काय म्हणतो

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा तसा अकालीच झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. पण सभासद वर्णन करतो की जाता जाता सुद्धा हा थोर मनुष्य आपल्यानंतर कसे वागा असे सांगून गेला. सभासद या प्रसंगाचे संपूर्ण वर्णन करतो. तो सांगतो की शिवाजी राजाने आपल्या सर्व जवळच्या व्यक्तीना  बोलावून घेतले. त्यांची नावे सुद्धा तो देतो. सभासद बखरीमध्ये शिवाजी राजांच्या मृत्यू बद्दल येणारे वर्णन खालील प्रमाणे- 
मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वाराची जाहाली. राजा पुण्यश्लोक. कालज्ञान जाणे. विचार पाहाता आयुष्याची मर्यादा जाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यांमध्ये सभ्य भले लोक बोलावून आणिले. बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिसहुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ. राज्य म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पुणे महाल होता त्यावरि एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले. हे गड, कोट व लष्कर पागा ऐसे मेळविले, परं…

पाऊस पडत होता

पाउस पडत होतापाउस पडत होता वारा उधळत होता अंधारलेल्या सायंकाळी तो मल्हार गात होता
धरती चिंब झालेली भिजलेली सजलेली आनंदाने धुंद रानात मयूर तो नाचत होता
नुकतीच फुटलेली पालवी हळूच वर बघत होती तिला पाहता पाहता  तो गुंग होत होता
हातात तिचा हात होता नजरेला नजर भिडली होती कोकिळेच्या गळ्यानी तो प्रेमगीत गात होता
                                                              - शंतनु