Skip to main content

उन्हाळ्यातील भटकंतीमुलांच्या परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्टी लागली. सगळीकडे आता plans चालू आहेत की नेमके भटकायला जायचे तरी कुठे? तर हे सुट्टीचे दोन महिने मस्त पैकी घालवता येतील अशी अनेक ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे थोडी अभ्यासपूर्ण भटकंती केली तर? उन्हाळ्यातील भटकंतीसाठी आपल्याकडे अनेक उपलब्ध पर्याय आहेत जसे की किल्ले, लेणी, जुनी मंदिरे आणि अभयारण्ये. प्रत्येकाचे एक स्वतःचे वैशिष्ट्य आहे.


किल्ले- खरे तर उन्हाळी भटकंतीमध्ये गड-किल्ले शक्यतो टाळावेत कारण उन्हाचा त्रास आणि पाण्याची कमतरता. पण वाटेवर गर्द झाडी असणारे वासोटा, कर्नाळा, अवचितगड यांसारखे किल्ले जरूर करावेत. म्हणजे ट्रेक पण होईल आणि करवंद इत्यादी रानमेव्याची मजा सुद्धा लुटता येईल. 

करवंदांचा  रानमेवा (photo Courtesy- Google)
कर्नाळा किल्ला 

लेणी- उन्हाळ्यात भटकंतीचा एक उत्तम पर्याय म्हणजे लेणी. सह्याद्रीच्या कातळाला सौंदर्याचा मुलामा चढवला तो या कातळात कोरलेल्या लेण्यांनी. प्राचीन इतिहासाचा ठेवा जपत ही आजही उभी आहेत. अजिंठा-वेरूळ, कार्ला यांच्यासारख्या प्रसिद्ध लेण्यांबरोबर येलघोल, गोमाशी, शिरवळ यांच्यासारखी निसर्गाच्या रम्य अधिवासात असलेली लेणी सुद्धा आवर्जून पहावीत. या भटकंतीचा फायदा असा की प्राचीन ठेवा पाहायला मिळतोच पण बाहेरील गरम वातावरणात आत असलेला थंडावा सुखावून जातो.  

बेडसे लेणी 

औरंगाबाद लेणी 

मंदिरे-
महाराष्ट्र हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तो केवळ या प्रांतात असणाऱ्या विविध प्राचीन मंदिरांमुळेच. सर्वसामान्य लोकांमध्ये ओळखली जाणारी हेमाडपंथी शैलीमधील मंदिरे असोत किंवा शिलाहारकालीन, चालुक्यकालीन मंदिरे असोत. ही सर्व तीर्थस्थाने भक्तीरसासोबतच शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणून ओळखली जातात. मूर्तींच्या चेहऱ्यावरील बोलके भाव, मुर्तीवरील आभूषणे, पुराणातील गोष्टी इत्यादी गोष्टी अगदी बारकाईने कोरलेल्या दिसतात. महाराष्ट्रात असणारी गोंदेश्वर, खिद्रापूर, अंबरनाथ, भुलेश्वर येथील मंदिरे म्हणजे तर एक अनमोल ठेवाच आहे. या ही तीर्थस्थाने पाहण्यासाठी काही विशेष कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत त्यामुळे अगदी सहकुटुंब अशी ट्रीप होऊ शकते. 

वाघेश्वर मंदिर, वाघेश्वर 
बहादूरगडचे भग्न मंदिर  

अभयारण्य-
ताडोबा अभयारण्यात मोकळा फिरणारा जंगलाचा राजा वाघ कुणाला आवडत नाही. मे महिन्याच्या सुमारास रानातील पाणीसाठा संपल्याने हे सर्व प्राणी-पक्षी पाणवठ्याजवळ येतात आणि त्यांचे मस्तपैकी दर्शन आपल्याला होते. ताडोबा, मेळघाट, फणसाड इत्यादी अभयारण्यात अनेक हौशी पर्यटक आवर्जून भेट देतात. जंगल अनुभवायचे असेल तर एका तरी अभयारण्याची भटकंती मस्ट.

हरिश्चंद्र गड -कळसुबाई अभयारण्य 
कर्नाळा अभयारण्य 

Comments

Popular posts from this blog

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –
“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …

त्रिशुंड गणेश मंदीर - सुंदर शिल्पकलेचा नमुना

मागे एकदा पाताळेश्वर मंदिरावर लेख लिहिला होता आणि बऱ्याच जणांनी मला मेसेज करून सांगितले की आम्ही पुण्यात राहून अजून पर्यंत इथे गेलोच नव्हतो पण तुझा ब्लॉग वाचून जाऊन बघून आलो. पुण्यामध्ये अशा अनेक वास्तू आहेत, मंदिरे आहेत की ज्यांचा अभिमान पुणेकरांना वाटला पाहिजे आणि त्या ऐतिहासिक स्थळांची जोपासना झाली पाहिजे. पण हे सर्व करण्याआधी आपल्याला ती स्थळे माहिती पाहिजेत आणि आपण ती जाऊन पहिली पाहिजेत. अशाच एका सुंदर मंदिराची माहिती देण्यासाठी या लेखाचा प्रपंच!!    जाण्यासाठी फडके हौदावरून पुढे सरळ जावे आणि सिद्धेश्वर चौक लागला की डावीकडे वळावे. किंवा फडके हौदाच्या इथे कुणालाही विचारले म्हणजे ते सांगतील. आजमितीला हे मंदीर  सोमवार पेठे मध्ये भर वस्तीत अंगाखांद्यावर कोरीव शिल्पांचे दागिने खेळवत भक्कमपणे उभे असलेले पण काहीसे दुर्लक्षित असलेले असे हे त्रिशुंड गणेश मंदीर. खरं तर इतके दिवस मलाही असे भव्य मंदीर येथे आहे याची कल्पना नव्हती. पण असाच एक लेख वाचून नुकताच तेथे जाऊन आलो आणि थक्क झालो. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात हे मंदीर कोरलेले आहे. म्हणजे २५० वर्ष झाली तरी हे मंदीर डौलात उभे आहे. या मंद…

सातवाहन राजघराण्याचा इतिहास- भाग १

सातवाहन मालिकेमधला हा तिसरा लेख! आधीच्या लेखांना उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार!! तर तिसरा लेख हा राजघराण्याविषयी असणार हे आधीच ठरलेले असल्याने लिहिणे हे भागच आहे. असो! तर सातवाहन घराण्याविषयी आपल्याला अनेक साधनांमध्ये मिळते आणि ती साधने कोणती हे आपण मागच्या लेखात पहिलेच. या लेखात राजघराणे कसे होते ते पाहण्यासाठी हल नावाच्या सातवाहन राजाने लिहिलेल्या गाथा सप्तशती या ग्रंथाचा आधार घेऊ. मग पुढे जमल्यास नाण्यांमधून किंवा शिलालेखांमधून कळणारे राजघराणे असा विषय घेता येईल.
सातवाहन घराणे हे महाराष्ट्रातले पहिले ज्ञात राजघराणे आणि ज्यांचा साम्राज्यविस्तार प्रचंड झाला आणि सुमारे ४०० वर्षे यांचे दायित्व कायम राहिले असे पराक्रमी व थोर म्हणता येईल. व्यापारास दिलेले उत्तेजन असो, धार्मिक सहिष्णुता असो किंवा राजकीय पटलावर केलेल्या चाली असोत, यांचे कर्तुत्व सगळीकडे उजळलेले दिसून येते. आपण पहिल्या लेखात पहिले की पुराणात यांचा उल्लेख हा आंध्रभृत्य असा येतो आणि त्याचा नेमका अर्थ काय हे सुद्धा पहिले. त्यामुळे उगाच त्यावर वेळ न घालवता आपण मूळ विषयाकडे जाऊ!!सातवाहन राजघराण्याबद्द…