Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017

शिवाजी राजांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच

काही दिवसांपूर्वी शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल सभासदाचे विचार सांगितले होते आणि त्याचबरोबर एका इंग्रज अधिकाऱ्याचे पत्र सुद्धा दिले होते. परंतु काही जणांनी सभासद बखरीवर शंका घेतली होती की यातील माहिती ही कितपत खरी आहे वगैरे. तर या लेखात इतर काही बखरींमध्ये किंवा पत्रांमध्ये आलेला उल्लेख देत आहे जेणेकरून हे लक्षात येईल की राजांचा मृत्यू हा आजारानेच झाला होता.
·जेधे शकावली- “शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे  यांनी देह ठेविला” जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते.
·शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २ लेख- २२८६
गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की, शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून (म्हणजे सोयराबाई यांच्याकडून) विषप्रयोग झाला असावा ज्या डाग रजिस्टर मधील संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे

·मराठ्यांची बखर- ग्रांड डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन
“यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो …

पावसाळ्यातील स्वच्छंद भटकंती

आता पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. चहुबाजूनी येणारे पावसाचे ढग सह्याद्रीच्या कड्यांना धडकत आहेत, अशा पावसाळी धुंद वातावरणात घरातून बाहेर न पडावेसे वाटले तर नवलच. तर या पावसाळी वातावरणात कुठे फिरावे याबद्दल हा लेख.
किल्ले- महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर धुव्वांधार पाउस पडतो. त्यामुळे पावसात गडांवर जाताना जरा जपूनच. शिवाय धुके आणि निसरड्या पायऱ्यांचा धोका असल्याने अवघड किल्ले टाळावेत. मात्र कोरीगड, तुंग, तिकोना,सुधागड,राजमाची अशा किल्ल्यांवरील केलेली पावसाळ्यातील भटकंती ही नक्कीच सुखावह असेल.
मंदिरे- पावसाळ्यात राउळांची भटकंती करण्यासारखे सुख नाही. मस्त पैकी गाडीतून पावसाचा आस्वाद घेत आपण सहकुटुंबएखादी छानशी ट्रीप काढू शकता. भुलेश्वर, बहादूरगडामधील मंदिरे, गोंदेश्वर, खिद्रापूर ही मंदिरे आवर्जून पहावीत अशी.

लेणी- या पावसाळी वातावरणात सह्याद्रीची कातळलेणी अजूनच खुलून दिसतात. वर्षभर बसलेली धूळ नाहीशी होऊन त्या कातळाला नवीन लकाकी येते आणि लेणीतील गंभीर वातावरणाला गरजणाऱ्या पावसाची साथ मिळून एक वेगळीच अनुभूती येते. या मस्त वातावरणात थोडी आडवाटेवर असणारी येलघोल, पाले लेणी, बेडसे लेणी, कान्हेरी लेण…

जिलेबी आणि पुरणपोळी

भारतीय खाद्य संस्कृतीबद्दल वाचताना भोजनकुतूहल हा मस्त ग्रंथ सापडला. रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिलेल्या या ग्रंथात अनेक पाककृतींचा समावेश आहे. पुस्तक संस्कृत मधले असले तरी या पाककृती सहज लक्षात येतात. अनेक नवीन पुस्तके याच्यापुढे झक मारतील असा हा ग्रंथ. यात जिलेबी आणि पुरणपोळी यांचे वर्णन सुद्धा दिले आहे. (गोड पदार्थ हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आधी तेच वाचले)

१. जिलेबी- नूतनं घटमादाय तस्यान्त: कुशलो जन:।
प्रस्थार्धपरिमाणेन दध्नाम्लेन प्रलेपयेत्॥ द्विप्रस्थां समितां तत्र दध्यम्लं प्रस्थसंमितम्। घृतमर्धशरावं च घोलयित्वा घटे क्षिपेत्॥ आतपे स्थापयेत्तावद्यावद्याति तदम्लताम्। ततस्तु प्रक्षिपेत्पात्रे सच्छिद्रे भाजने च तत्॥ परिभ्राम्य परिभ्राम्य तत्संतप्ते घृते क्षिपेत्। पुन: पुनस्तत्प्रवृत्य विदध्यान्मण्डलाकृतिम्॥ तां सुपक्वां घृतान्नीत्वा सितापाके तनुद्रवे। कर्पूरादिसुगन्धे च श्रमयित्वोद्धरेत्तत:॥ एषा कुण्डलिनी नाम्ना पुष्टिकान्तिबलप्रदा।

नवा घडा घेऊन त्याच्या आतील भागावर अर्धा प्रस्थ (एक शेर) आंबट दही लेपावे. चार शेर कणीक, एक शेर दही आणि अर्धा शेर तूप चांगले मिसळून घडया…