जिलेबी आणि पुरणपोळी

भारतीय खाद्य संस्कृतीबद्दल वाचताना भोजनकुतूहल हा मस्त ग्रंथ सापडला. रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिलेल्या या ग्रंथात अनेक पाककृतींचा समावेश आहे. पुस्तक संस्कृत मधले असले तरी या पाककृती सहज लक्षात येतात. अनेक नवीन पुस्तके याच्यापुढे झक मारतील असा हा ग्रंथ. यात जिलेबी आणि पुरणपोळी यांचे वर्णन सुद्धा दिले आहे. (गोड पदार्थ हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आधी तेच वाचले)


१. जिलेबी-

नूतनं घटमादाय तस्यान्त: कुशलो जन:।

प्रस्थार्धपरिमाणेन दध्नाम्लेन प्रलेपयेत्॥
द्विप्रस्थां समितां तत्र दध्यम्लं प्रस्थसंमितम्।
घृतमर्धशरावं च घोलयित्वा घटे क्षिपेत्॥
आतपे स्थापयेत्तावद्यावद्याति तदम्लताम्।
ततस्तु प्रक्षिपेत्पात्रे सच्छिद्रे भाजने च तत्॥
परिभ्राम्य परिभ्राम्य तत्संतप्ते घृते क्षिपेत्।
पुन: पुनस्तत्प्रवृत्य विदध्यान्मण्डलाकृतिम्॥
तां सुपक्वां घृतान्नीत्वा सितापाके तनुद्रवे।
कर्पूरादिसुगन्धे च श्रमयित्वोद्धरेत्तत:॥
एषा कुण्डलिनी नाम्ना पुष्टिकान्तिबलप्रदा।


नवा घडा घेऊन त्याच्या आतील भागावर अर्धा प्रस्थ (एक शेर) आंबट दही लेपावे. चार शेर कणीक, एक शेर दही आणि अर्धा शेर तूप चांगले मिसळून घडयामध्ये भरावे. मिश्रण आंबेपर्यंत घडा उन्हात ठेवावा. छिद्र असलेल्या भांडयामध्ये काढून घेऊन मिश्रण उकळत्या तुपामध्ये पाडून आणि फिरवून फिरवून वर्तुळाकार आकृति करावी. चांगली तळली गेल्यावर तिला तुपातून काढून कापूर इत्यादींनी सुवासित केलेल्या घट्टसर साखरपाकामध्ये बुडवून काढावी. याला कुण्डलिनी असे नाव आहे.
2. पुरणपोळी

पोळिका पूर्णगर्भा तु गुर्वी स्याद्गुडदालिता

गुळ आणि डाळ यांचे मिश्रण भरलेली पोळी म्हणजे पुरणपोळीYou Might Also Like

1 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });