Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

पावसाळ्यातील भटकंतीची हटके डेस्टीनेशन्स

ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो पाउस यंदा थोडा लवकरच आला! थोडा वेळ महाराष्ट्राच्या सीमेवर रेंगाळून त्याने आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरला आहे. कोकणात मुसळधार पडणारा हा घाटावर येऊन थोडा शांत झालेला असला तरी तापलेल्या जमिनीला शांत करण्याचे काम त्याने चोखपणे निभावलेले आहे आणि आता सर्व जमीन हिरवागार शालू अंगावर लपेटू लागली आहे. अशा या मदहोश वातावरणात घरातून बाहेर पडून मस्त पैकी फिरस्ती करण्याचा मोह कुणाला होणार नाही. मात्र लोणावळा, मढे घाट, ताम्हिणी घाट यांसारख्या ठिकाणांवर होणारी प्रचंड गर्दी बघता, या पावसाचा आनंद घ्यायचा कसा आणि कुठे असा प्रश्न नक्कीच सर्वाना पडला असेल.नेहमीच्या भटक्यांना अशी ठिकाणे माहिती असली तरी सर्वसामान्य पर्यटक तिथपर्यंत माहितीअभावी पोहोचतच नाहीत. अशा काही नवीन पण पावसाचा धमाल अनुभव देणारी ही ठिकाणे नव्याने वर्षा सहलीची ठिकाणे म्हणून नक्कीच उदयास येऊ शकतात आणि प्रसिद्ध ठिकाणांवरील गर्दीचा ताण कमी व्हायला यांमुळे थोडीफार मदत होईल.येलघोल-पुणे जिल्ह्यातील प्रेमात पडावी अशी अनेक लेणी आहेत. कार्ले, भाजे, बेडसे अशा प्रसिद्ध लेणीना अनेक पर्यटक भेट देतात …