Skip to main content

Posts

Showing posts from August, 2017

रणमर्द बाजीप्रभू देशपांडे

अनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न 'इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात. अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुमानत नाहीत! असो काही का असेना परंतु बाजीप्रभू  हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला! याच शूर सेनानीला नमन करण्यासाठी हा लेखप्रपंच!!
बाजीप्रभू देशपांडे या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे तो असा, “बाजीप्रभूंचा जन्म हा भार्गव गोत्रात झाला. ते भोर पासून ३ मैलांवर असलेल्या सिंध गावी जन्मले. त्यांचे आडनाव प्रधान असे होते. तेराव्या शतकात मुसलमान लोकांनी मांडवगडचे हिंदू साम्राज्य खालसा केल्यामुळे जी काही प्रभू घराणी दक्षिणेत उतरली त्यात ‘रघुनाथ देवराव प्रधान’ हे होते. पुढे दक्षिणेतील राजांकडून व बहामनी राजांकडून जी वतने व अधिकार मिळाले त्या हुद्द्यावरून मिळालेली प्रधान, देशपांडे, चिटणवीस, गडकरी, कुलकर्णी अशी उपनावे प…

महाराष्ट्रातील आगळे वेगळी गणपती

पूर्वप्रकाशित सकाळ साप्ताहिक गणपती विशेषांक दिनांक १९/०८/२०१७ - इथे पहा

    महाराष्ट्रात गणेशाचे पूजन ही तशी जुनीच परंपरा!! अनेक वर्षांपासून या आपल्या लाडक्या देवतेची पूजा महाराष्ट्रातील सर्व भाविक करत आले आहेत. गावाच्या वेशीवर असणारा हा देव! साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात याचा समावेश इतर देवतांच्या मांदियाळीमध्ये झाला असावा हा कयास! त्यामुळे जुने ओबडधोबड रूप सोडून याला मोठे कान, सोंड असे आत्ताचे रुपडे सुद्धा याच कालावधीत मिळाले असावे. भारतात लिहिलेल्या वेगवेगळ्या पुराणात तर याला इतके महत्त्व मिळाले की या देवतेला पुढे अग्रपुजेचा मान मिळाला. ‘प्रथम तुला वंदितो’ करीत महाराष्ट्रातील अबाल-वृद्ध याची मनोभावे सेवा करत आले आहेत.
   महाराष्ट्रातील गणपतींचे मला विचाराल तर मी दोन प्रकारात वर्गीकरण करेन!! एक म्हणजे प्रसिद्ध असलेले आणि दुसरे म्हणजे अतिशय वेगळे रूप असणारे परंतु फारसे प्रसिद्ध नसलेले. प्रसिद्ध गणपतींमध्ये मग अष्टविनायक, मुंबईतील सिद्धिविनायक असे गणपती येतील तर दुसऱ्या प्रकारात भुलेश्वरचा स्त्रीरूपातील गणपती किंवा भोरगिरी येथील गणेश मुर्ती, त्रिशुंड गणपती असे अनेक येतील. तर या लेख…

पेशवाईतील सांकेतिक लिपी

पेशव्यांचा इतिहास हा काही प्रमाणात मजेशीर सुद्धा आहे हे पेशवे दफ्तर वाचताना जाणवले. पेशवे दफ्तरातील कागदपत्रे या ग्रंथाच्या २२ व्या खंडात १५५ पृष्ठ क्रमांकावर एक पत्र आहे. त्याचे मूळ मोडी पत्र त्याच खंडाच्या सुरुवातीला छापले आहे! (दोन्ही पत्रे खाली देत आहे!!) त्या पत्रातली भाषा सांकेतिक आहे हे सहज कळून येते. कसल्यातरी खर्चाचा तपशील यात असावा असा अंदाज त्यात असणाऱ्या आकड्यांवरून लागतो, हे उघड असले तरी ही लिपी नेमकी काय आणि तिचा उलगडा कसा करायचा हे काही समजत नव्हते!! इतक्यात दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक संकीर्ण खंड वाचत असताना त्या श्री. ना. स. इनामदार (राऊ कादंबरीचे लेखक) यांचा लेख वाचण्यात आला. त्यात त्यांनी ही लिपी उलगडून दाखवली आहे!! मोठी मजेशीर आहे!!


वर पहिल्या फोटोमध्ये ते मूळ मोडीपत्र दिले आहे तर खाली त्याचे लिप्यंतर!! ना. स. इनामदार ही लिपी वाचण्याचे काही नियम सांगतात ते असे- ·      १) प्रत्येक नोंदीचे नऊ अक्षरांचा एक असे खंड पाडावे

     २) प्रत्येक खंडातील शेवटचे एक अक्षर सामान्यतः मनाचे भाकड वापरले आहे. हे खोटे अक्षर व्यंजनाच्या अनुक्रमाने येते. जसे की क. ख, ग, घ. सवयीने हे अक्षर च…

लोकमान्य टिळक, कृष्णाजी खाजगीवाले आणि गणेशोत्सव

लेखाचे नाव वाचून तुम्ही म्हणाल की काय खेळ चालू आहे!! दोन-चार दिवसांपूर्वी एक लेख लिहिला लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव या नावाने आणि आता कृष्णाजी खाजगीवाले हे नाव कुठून आले मध्येच!! तर ती सुद्धा एक गंमतच आहे! आज महाराष्ट्रात किंवा पुण्यात म्हणले तर एका गोष्टीवरून वाद चालू आहे की सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कुणी सुरु केला. सर्वसामान्य माणसाला उत्तर विचारले तर याचे सरळ उत्तर म्हणजे ‘लोकमान्य टिळक’ असेच येईल त्याला कारण सुद्धा तसेच आहे की गावागावात हा उत्सव टिळकांनीच पोचवला! काही इंग्रजी समकालीन लेखक उदाहरणार्थ Valentine Chirol (ज्याने टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणले तो) हा लेखक आपल्या ‘The Indian Unrest’ या १९१० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात असे म्हणतो की, “In order invest it more definitely religious sanction, TIlak Placed it under the special patronage of the most popular deity in India.” “Tilak could not have devised a more popular move than when he set himself to organize annual festival in honor of Ganesh, known as Ganpati Celebration” (The Indian Unrest, pg. 44).केवढ…

लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव

हल्ली बराच चर्चेत असणारा विषय त्यामुळे आपणही या विषयावर काहीबाही खरडावे असे वाटल्यामुळे हा छोटेखानी लेख!!
या लेखाचे दोन भाग आहेत एक म्हणजे उत्सव म्हणजे काय आणि दुसरे म्हणजे एखादा उत्सव हा कोणत्या कारणासाठी सुरु केला गेला. सर्वप्रथम 'उत्सव' या शब्दाची अशी ढोबळ व्याख्या करता येईल की 'उत्सव म्हणजे एखाद्या धार्मिक कार्यात जेव्हा संपूर्ण समाजाला सामायिक केले जाते, आणि जो साजरा केल्याने मनाला समाधान मिळते असा दिवस किंव क्षण.' एखादी गोष्ट मी स्वतापुर्ती मर्यादित ठेवली आणि ४ लोकांना एकत्र करून जर तो साजरा केला तर तो उत्सव होईल का यात थोडे मतभेद होऊ शकतात.


हल्लीचा जो हॉट topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली??? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्…

अष्टप्रधान मंडळ

आपल्याला लहान असताना बरेच वेळा शिकवले जाते की शिवरायांची राज्यकारभाराची पद्धत ही प्रधान पद्धत होती आणि ते काही अंशी बरोबर सुद्धा आहे. शिवाजी राजांनी ही पद्धत मुसलमान शासकांकडून घेतली हे उघड आहे कारण पेशवा, मुजुमदार,वाकनीस,सुरनीस,डबीर इत्यादी अधिकाऱ्यांची नावे मुघल प्रशासनात बऱ्याच वेळेला येतात. हीच नावे राजांनी राज्यव्यवहारकोशात संस्कृत भाषेत देताना प्रधान, अमात्य,मंत्री,सचिव,सुमंत इत्यादी नावे दिली. पण येथे मुद्दा हा निराळाच आहे आणि तो म्हणजे नावाप्रमाणे खरोखर आठ प्रधान होते का??

आता तुम्ही म्हणाल की काहीही लिहितोस राव तू! नावात तर अष्ट आहे त्यामुळे प्रधानांची संख्या सुद्धा आठ असणार हे उघड आहे. माझेही मत सुद्धा पूर्वी तसेच होते पण काही पत्रांमध्ये येणारा उल्लेख जरासा वेगळा येतो! अष्टप्रधान म्हणजे आठ प्रधान हे विधान विविध ऐतिहासिक पत्रांच्या सहाय्याने खोटे ठरते आणि दिसून येते की ही संख्या आठ पेक्षा जास्त असावी. ही पत्रे ‘काव्येइतिहाससंग्रह’ यामासिकात तर‘काव्येइतिहाससंग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख’ या पुस्तकामध्ये छापली आहेत. 
यातील प्रथम पत्र आहे ते म्हणजे खेम साव…