Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

भारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी

पूर्वप्रकाशित- सामना- उत्सव पुरवणी दिनांक २४ सप्टेंबर २०१७
सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरु आहे. पुढचे काही दिवस अनेक जण आपापल्या आराध्य देवींची पूजा अर्चा करण्यात व्यस्त असतील. काही जणांची देवी दुर्गा असेल तर काही जणांची लक्ष्मीपरंतु यामागे भक्तीभाव हा सारखाच असतो. हे नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर संपूर्ण भारत देश घालणार एवढ मात्र खरे. भारतात शक्तीची उपासना करणे ही काही नवी गोष्ट नाही तर त्यामागे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. या लेखाद्वारे प्राचीन भारतात होणाऱ्या शक्तीच्या उपासनेचे महत्त्व आपण जाणून घेऊ.
संपूर्ण जगात केल्या जाणाऱ्या प्राचीन उपासनेत शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीच्या महत्वामुळे ही उपासना केली जात असावी. भारतात किंवा भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यात प्रामुख्याने बलुचिस्तान असो किंवा इराण असो, सिरिया, इजिप्त असो या सर्व ठिकाणी आज भारतात ज्या शक्तीप्रतिमा म्हणून ओळखल्या जातात तशाप्रकारच्या अनेक मूर्ती सापडल्या. यावरून हे कळून येते की या उपासनेचे धागेदोरे किती दूरवर पसरलेले होते. भारतात सुद्धा जे उत्खनन झाले त्यात ज्या मूर्ती सापडल्या…