55 कोटी कुणामुळे दिले गेले...!!!गांधीहत्येच्या खटल्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाकिस्तानला खजिन्यातील हिस्सा म्हणून 55 कोटी रुपये देणे. भारताचा १/३ भाग पाकिस्तानला दिल्यावर, खजिन्यातला हिस्सा सुद्धा दिला पाहिजे असं मत पाकिस्तानचे नेते मांडत होते.. यावेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रेस नोट दिनांक 12 जानेवारी 1948 रोजी काढली त्यात त्यांनी असे म्हणले आहे की, " It was found that feverish attempts were being made by the Pakistan Government to secure the payment of Rs. 55 crores which it had been agreed to allocate to Pakistan out of the cash balances. We resisted these attempts." म्हणजेच सरकारचा 55 कोटी देण्याला विरोध होता.

पटेल पुढे म्हणतात की, "The  Pakistan  Finance  Minister  claims  the  amount  of  Rs.  55  crores  as belonging to Pakistan. He has apparently overlooked the fact that on the 14th August 1947, after the Partition Council had decided to allocate the working balance ofRs. 20 crores to the Pakistan Government, the then undivided Government of India issued an order in the following terms to the Reserve Bank: PLEASE  TRANSFER  TWENTY,  HALF  OF  FORTY  CRORES,  FROM CENTRAL  CLOSING  CASH  BALANCE  ON  THE  14TH  INSTANT TO   PAKISTAN   AND  BALANCE  TO  INDIAN   DOMINION  AS OPENING   BALANCE    ON    THE    15TH.

"A copy of this telegram was endorsed to the Pakistan wing of the then Finance Department, and no objection was, or has been, raised to this accounting. It follows from this that so far as the bank accounts are concerned, there is no balance of the old undivided Government to be operated upon; the money stands in the name of the Indian Dominion and it is only on the authority of the Indian Dominion that any share can be allocated to the Government of Pakistan. The relevant portion of the Partition Council minutes also runs thus: “In addition to the 20 crores, already made over to Pakistan, 55 crores will be allocated to Pakistan in full and final settlement of its claim for a share of  the  undivided  Government’s  cash  balance  and  of  the  cash  balance investment account.” It is clear, therefore, that nothing belongs to Pakistan until the Government of India transfer the amount to its account."

थोडक्यात काय तर पाकिस्तानला 20 कोटी रुपये आधीच देऊन झाले होते आणि आता उरलेले 55 कोटी देणे हे भारत सरकारच्या हातात होते.. ते द्यायचे का नाही हा पूर्णतः भारत सरकारच्या निर्णय होता.

थोडक्यात 12 जानेवारी पर्यंत पाकिस्तानला 55 कोटी देण्यास भारत सरकार तयार नव्हते.. याची कारणे अनेक आहेत जी सरदार पटेल यांनी दिली आहेत.. पुढे 16 जानेवारी रोजी भारत सरकारने हिंदुस्थान टाइम्सला एक प्रेस रिलीज काढला त्यात स्पष्ट म्हणले गेले की,"The  Government  have  decided  to  implement  immediately  the  financial agreement with Pakistan in regard to the cash balances. The amount due to Pakistan on the basis of the agreement, i. e., Rs. 55 crores, minus the expenditure incurred by the Government of India since August 15 on Pakistan account will, therefore, be paid to the Government of Pakistan. The decision is the Government contribution, to the best of its ability, to the non-violent and noble effort made by  Gandhiji  in  accordance  with  the  glorious traditions of this great country, for peace and goodwill."

सहा दिवसातच भारत सरकारच्या निर्णय कसा काय बदलला गेला याचे कारण यात दिले आहे.. गांधीजींचे अनेक समर्थक म्हणतात 55 कोटींसाठी गांधीजींनी उपोषण नाही केले, माझ्यामते भारत सरकारनेच दिलेल्या प्रेस रिलीज मध्ये याचे उत्तर आहे..

संदर्भ - The collected works of Mahatma Gandhi Volume 98 page no. 460-466

© 2017, Shantanu Paranjape

You Might Also Like

1 comments

  1. 55 कोटींचा मुद्दा उपस्थित करून मुद्दामहून दिशाभूल केली जात आहे. दोन गोष्टी आहेत. एक) एका देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हि रक्कम त्याकाळात सुद्धा काहीच नव्हती. पाकिस्तानचे केवळ दोन अर्थसंकल्प त्यात झाले असते. दोन) गांधीहत्येला "५५ कोटी ची मदत" हा मुद्दा कारणीभूत असता तर नथूरामने त्या पूर्वी सुद्धा १९४५ ला गांधींवर हल्ल्याचा प्रयत्न केला त्याचे कारण काय? कारण १९४५ साली ५५ कोटींचा मुद्दा नव्हताच. गांधीनी जनसामान्यांची मोठी चळवळ उभी करून लोकांत जागृतीनिर्माण केली आणि जनसामान्यांना सत्तेत स्थान मिळवून दिले. त्याआधी इंग्रजांकडून केवळ धार्मिक मूठभरांच्या हाती सत्ता यावी हे हिंदुत्ववाद्यांचे मनसुबे होते. ते गांधीनी धुळीस मिळवले. सावकरादी वृतींचा नेहरू/गांधीविरोधात म्हणूनच पोटशूळ आहे. आजतागायत.

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });