विरोध नोटाबंदीला काया विषयावर लिहिणार नव्हतो परंतु अनेक ठिकाणी वाचले की निर्णय कसा फेल होता वगैरे त्यामुळे म्हणलं आपलं 'अर्थशास्त्राचे ज्ञान' पाजाळू थोडं

1. नोटबंदीमुळे झालेले नुकसान नेमके कोणते असेल तर ते म्हणजे wasting of man hours.. अर्थात नोटा जमा करायला 2 महिने दिले होते पण भारतीय लोक पॅनिक लवकर होतात त्यामुळे एकाच दिवशी सगळे धावल्यावर गर्दी उडाली आणि सिस्टिम तेवढी सक्षम नव्हती.. (माझ्यासारख्याने निवांत 30 नोव्हेंबरला जाऊन नोटा जमा केल्याने 2 मिनिटात काम झाले ती गोष्ट वेगळी)

2. ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले कारण तिकडे बँकांची सुविधा इतकी पुरेशी नव्हती परंतु नोटा या 500 आणि 1000 च्या बंद केल्या असल्यामुळे काही फार फरक नाही पडणार.. गरीब लोकांकडे याच नोटा सर्वाधिक आहेत असे जर असेल तर मग भारतात गरीबीची व्याख्या काय ते पाहावे लागेल.

3. जीडीपी वगैरे घसरला..( कॉमर्सचा विद्यार्थी असून सुद्धा भारताचा खरा जीडीपी मला माहिती नाही त्यामुळे हा घसरला म्हणजे नेमका किती आणि त्यामुळे भारतात मंदी वगैरे का नाही आली हा एक पडलेला प्रश्न आहे)

4. 99% नोटा जमा झाल्या--- (नोटा बंदी ही नोटा जमा होऊ नयेत यासाठी नव्हतीच मुळी.. उलट लोकांनी पैसे जमा करून मस्त पैकी अडकण्यासाठी होती... आता बसलेत डोक्याला हात लावून.. इन्कम टॅक्सची नोटीस अनेक जणांना आलेली माझ्या पाहण्यात आली आहे.. आणि गम्मत म्हणजे यावर्षी रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली त्याचे काय)

नोटबंदीला विरोध कशासाठी-

1. आता बहुतांश व्यवहार बँकेत करावे लागणार असल्याने आम्ही जमा करत असलेले काळे धन आता सरकारला दाखवायला लागणार ही सर्वात मोठी खंत. त्यावर मला टॅक्स भरायला लागणार.. आणि आत्तापर्यंत जमवलेली काळी माया जाणार.. ही भीती लोकांच्या मनात आली यातच नोटाबंदीचे फलित दिसून येते..

2. कॅश मध्ये लाच घेण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे कुणी नाकारू शकेल काय!??

मुळात हे म्हणणे आहे की कॅशची गरज लागते कशाला!?? उत्तर हे की भाजीपाला वगैरे घेण्यासाठी!!  कोणत्याही व्यक्तीला महिन्यासाठी जास्तीत जास्त 10000 भाजीपाला नक्कीच पुरतो आणि ते काढण्याची सुविधा सरकारने केली होतीच की..!!

त्यामुळे नोटाबंद केल्या, नुकसान झाले असे बोंबलणाऱ्या लोकांनी आपले नेमके 'नुकसान' काय झाले ते कमेंटमध्ये लिहून जरूर कळवावे...

© 2017, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });