Skip to main content

न्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात!!गांधी हत्येच्या खटल्यात एकूण तीन न्यायाधीशांनी काम पाहिले.. त्यातील G D Khosla हे Chief Justice होते.. Mr.  G D Khosla हे गांधीजींना खूप मानत असत. जेव्हा नथुरामने स्वतःची केस स्वतः लढवणार अशी विनंती केली तेव्हा न्यायालयाने त्याला तशी परवानगी दिली.. त्यावेळी न्यायालयात सामान्य लोकं तसेच प्रेस वगैरेंना येऊन खटला ऐकण्याची परवानगी होती. न्यायमूर्ती म्हणतात की नथुरामने आपल्या प्रखर विद्वात्तेचे प्रदर्शन करत त्याचे म्हणणे मांडले.. या G D Khosla यांनी The Murder of Mahatma नावाचे एक पुस्तक लिहिले आहे, त्यात या सर्व आठवणी नमूद केल्या आहेत.

ते म्हणतात, "  He(Nathuram)  made  moving  references  to historical  events  and  delivered  an  impassioned  appeal  to  Hindus  to  hold  and preserve  their  motherland  and  fight  for  it  with  their  very  lives.  He  ended  his peroration  on  a  high  note  emotion,  reciting  verses  from  Bhagwadgita"

"नथुरामने आपले म्हणणे मांडताना अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले. त्याने हिंदूंना आपल्या मातृभूमीसाठी लढण्याचे आवाहन देखील केले. शेवट करताना त्याने भगवदगीतेतील काही श्लोकांचा आधार देखील घेतला".

नथुरामने आपले म्हणणे मांडल्यावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांची परिस्थिती काय होत असे याचे वर्णन करताना न्यायमूर्ती म्हणतात, "The  audience  was  visibly  and  audibly  moved.  There  was  a  deep  silence  when  he ceased  speaking.  Many  women  were  in  tears  and  men  were  coughing  and searching  for  their  handkerchiefs.  The  silence  was  accentuated  and  made deeper  by  the  sound  of  a  occasional  subdued  sniff  or  a  muffled  cough.  It seemed  to  me  that  I  was  taking  part  in  some  kind  of  melodrama  or  in  a  scene out  of  a  Hollywood  feature  film."

"नथुरामने आपले बोलणे संपावल्यावर न्यायालयात शांतता पसरली होती. अनेक बायकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मधूनच येणारे खोकल्याचे आवाज ती शांतता अधिक गहिरी करत होते. एखाद्या हॉलीवूड मधील चित्रपटाच्या सिरीयस दृश्यामधला प्रसंग वाटत होता".

न्यायमूर्ती पुढे लिहितात की, "Once  or  twice  I  had  interrupted  Godse  and pointed  out  the  irrelevance  of  what  he  was  saying,  but  my  colleagues  seemed inclined  to  hear  him  and  the  audience  most  certainly  thought  that  Godse's performance  was  the  only  worth-while  part  of  the  lengthy  proceedings.  A writer's  curiosity  in  watching  the  interplay  of  impact  and  response  made  me abstain  from  being  too  conscientious  in  the  matter. Also  I  said  to  myself:  'The man  is  going  to  die  soon.  He  is  past  doing  any  harm.  He  should  be  allowed  to  let off  steam  for  the  last  time."

" मी एक दोनदा नथुरामला मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या दोन सहन्यायाधीशांना त्याचे बोलणे ऐकण्यात रस होता.. या कंटाळवाण्या केस मध्ये नथुरामचा बोलणे हाच काय तो ऐकण्यासारखा भाग होता. मग मी विचार केला की हा माणूस आता थोड्याच दिवसात मरणार आहे तसेच काही वाईट करायच्या पलीकडे तो पोहोचलेला आहे तर त्याला बोलण्याची एक संधी देऊया."

न्यायमूर्ती पुढे लिहितात, " I  have,  however,  no  doubt  that  had  the  audience  of  that  day  been  constituted into  a  jury  and  entrusted  with  the  task  of  deciding  Godse's  appeal,  they  would have  brought  in  a  verdict  of  '  not  guilty'  by  an  overwhelming  majority."

म्हणजेच जर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना जर नथुरामच्या शिक्षेबद्दल निर्णय घ्यायला सांगितला तर सर्व जण त्याला बहुमताने निर्दोष घोषित करतील.

संदर्भ -  The Murder of the Mahatma   By : G. D. Khosla (Formerly Chief Justice of Punjab, who heard the appeal of Nathuram Godse & others and gave his most historic verdict in the case of assassination)


© 2017, Shantanu Paranjape

Comments

Popular posts from this blog

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –
“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का!३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.
केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …

BIRDS OF MAHARASHTRA

BIRDS OF MAHARASHTRA
I started birding in around June, when i had my new camera (Canon Power shot SX 400). I visited some birding spot near Pune and Pune outskirts and now I am having plenty of documentation on birds. So i just thought of sharing with you through this blog.. You may find interesting my new series of blog  'BIRDS OF MAHARASHTRA'. In this I will try to give information of some birds with pictures taken by me and some taken from the internet..   


Let's start with some simple and common birds..

1) COPPER SMITH BARBET.
IntroductionThe Coppersmith Barbet known by other names like Crimson-breasted Barbet or Coppersmith has the scientific name Megalaima haemacephala is a bird with Grass green color feathers which is a resident of India and other countries of South Asia. About nine subspecies of Coppersmith Barbet is recognized. The other Indian local names of this species are tuktukiya, Basanta and thathera. 
Characteristics:This grass green colored bird with crimson …