Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

सिंहगड व्हॅली- पक्ष्यांचे नंदनवन (Sinhagad Valley)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभयारण्ये आहेत. काही पक्ष्यांसाठी प्रसिद्ध तर काही इतर अन्य वन्य जीवांसाठी पण अशी अनेक ठिकाणे आहेत जी अभयारण्ये नसून सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. यातील एक ठिकाण म्हणजे सिंहगडाची दरी. बहुतांश लोकं याला सिंहगड व्हॅली या नावाने सुद्धा संबोधतात. जवळपास हिवाळ्यातील प्रत्येक रविवारी इथे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रण करण्यासाठी लोकांची वर्दळ असते. सह्याद्रीच्या प्रमुख अशा भुलेश्वर रांगेत वसलेला सिंहगड, त्याचे ऐतिहासिक महत्व यांमुळे सिंहगडावर जाण्यासाठी अनेक लोकं गर्दी करतात पण इथे आढळणाऱ्या पक्ष्यांची दखल घेण्यासाठी मात्र मोजकेच थोडे लोकं फिरकतात. अर्थात सरकारी यंत्रणांमध्ये असणारी उदासीनता, इथे आढळणाऱ्या जैवविविधतेचे व्यवस्थित प्रकारे डॉक्यूमेंटेशन न करणे ही महत्वाची कारणे.सिंहगड व्हॅली ही किल्ल्याच्या दोन्ही बाजूला आहे पण गर्दी मात्र आतकरवाडीमध्येच होते. इथे जाणे अत्यंत सोपे आहे, सिंहगड किल्ला चढायची सुरुवात होण्यापूर्वीच डावीकडे जो रस्ता जातो तिथपासूनच व्हॅलीची सुरुवात होते. पावसाळ्यात आढळणारी विविध फुले, हिवाळ्यातील स्थलांतरीत पक्षी आणि विविध फ…