Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

भारतातील गरुडमूर्ती

आजवर उंच आकाशात भरारी मारणारा पक्ष्यांचा राजा असेच गरुडाचे वर्णन सर्वसामन्यांच्या ओळखीचे. संस्कृत मध्ये याला ‘वैनतेय’ वगैरे नाव देऊन चांगला भारदस्त पणा सुद्धा आणला आहे. पक्ष्यांचा राजा याशिवाय भगवान विष्णूचे वाहन म्हणून सुद्धा गरुड हा पक्षी भारतात प्रसिद्ध आहे. गरुडाच्या जन्माची सुद्धा एक छान कथा आपल्या पुराणात सांगीतली आहे. सूर्याचा रंग कोणता या पैजेत नाग लोकांच्या कारस्थानामुळे विनिता हीला नागमाताकद्रू हिचे दास्यत्व पत्करावे लागले. या गुलामीतून सुटण्याची एकच अट आणि ती म्हणजे स्वर्गलोकातून नागांना अमृताचे कुंभ आणून देतील. पक्षीकुळात जन्मलेल्या या विनिताचा आणि कश्यप ऋषी यांचा सुपुत्र म्हणजे गरुड. आपली आईज्या नागांच्या दास्यात आहे हे समजल्यामुळे गरुडाचे नागांशी अगदी जन्मापासूनचे वैर होते. परंतु आईला सोडवायचे तर स्वगार्तून अमृतकुंभ आणून देणे गरजेचे होते त्यामुळेगरुडानेस्वर्गावर आक्रमण केले आणि तेव्हा झालेल्या युद्धात इंद्राचा पराभव झाला. नंतर पुढेअशी अशी युक्ती करण्यात आली की गरुडाने तो अमृतकुंभ हा नागांच्या हवाली करावा आणि नागांनी ते अमृतप्राशन करण्याआधीच इंद्राने तो पळवावा. अर्थात या …