पक्षी निरीक्षण - प्रत्येकाला हवाच असा एक छंद (भाग - १) Bird watching - A must have hobby

 • August 04, 2020
 • By Shantanu Paranjape
 • 4 Comments

ब्लॉग वाचण्याधी मला तुम्हाला सर्वाना एक प्रश्न आहे..!!

कुठेही न बघता तुम्ही पाहिलेल्या किती पक्षांची नावे तुम्ही सांगू शकता? ऐकली बरीच असतील म्हणून मी पाहिलेल्या म्हणालो. बघा बर कागदावर लिहून त्यांची संख्या किती होते ते..!

२५? ३०? ५०? तुम्ही जर पक्षी निरीक्षण केले नसेल तर माझ्यामते या पेक्षा जास्त होणार नाही.

तुम्हाला माहिती आहे की भारतात किती पक्षी आहेत? एक अंदाज करून बघा? आणि महाराष्ट्रात? - 

१३०१ पक्ष्यांच्या जाती आहेत भारतात. यातील काही इथलेच आहेत तर काही थंडीत फिरायला म्हणून येतात आणि थंडी जायला लागली की पुन्हा जातात. त्यांना आपल्या इथली थंडी आवडते म्हणून नाही तर युरोपातली थंडी ही आपल्यापेक्षा भयंकर असते म्हणून.. 

Bar-headed Goose - eBird

Bar Headed Goose (खूप उंचावरून उडत आपल्याइथे येणारे पक्षी)

महाराष्ट्रापुरता विचार केला तर आपल्या राज्यातच सुमारे ६४५ प्रकारचे पक्षी आढळून येतात. इथे त्यांची सर्व यादी मिळेल. पण मग एवढे सारे पक्षी असताना आपल्याला मात्र ४०-५० माहिती असे कसे? हा विचार तुमच्या मनात आला असेल. 

याचे उत्तर म्हणजे आपले वय जास्त आहे. तुम्ही म्हणाल हे काय म्हणतो आहे हा..! वय जास्त आहे म्हणून पक्षी कमी माहिती असं कस.. याचे कारण म्हणजे तुमच्यात curiostiy राहिली नाही जी लहान मुलांच्यात असते. आपण पुण्यात राहत असाल तर सिंहगडावर नक्की गेला असाल. अनेक वेळा गेला असाल आणि तिथली भजी वगैरे खाल्ली असेल पण सिंहगडाच्या खाली असलेल्या दरीत कधी गेला आहात का? या दरीतच वर सांगितलेल्या ६४५ मधले सुमारे १५० पेक्षा जास्त पक्षी दिसतात. काही अगदी सहज दिसतात.  

Green Humour: The Wildlife Map of Maharashtra

http://www.greenhumour.com/2019/07/the-wildlife-map-of-maharashtra.html

पक्षी निरीक्षण हे एक वेड आहे. आणि ते तसे का आहे हे जो पक्षी निरीक्षण करतो त्यालाच समजते. मी या छंदात पडलो ते २०१५ साली. माझ्याकडे ३० x झूम असलेला कॅमेरा आला आणि मित्राने बळजबरीने बाहेर काढले की चल तुला पक्षी दाखवतो. पक्षी निरक्षण करायचे असेल तर सुरुवातीला तरी यातला जाणकार माणूस तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला अजिबात कळणार नाही आणि तुम्ही विषय सोडून द्याल. 

तर या माझ्या मित्राने पुण्याजवळ असलेल्या वेताळ टेकडीवर मला नेले आणि एक एक पक्षी दाखवायला लागला. १०-१५ पक्षी पाहिलेला मी ते सर्व बघून वेडाच झालो आणि अधाशासारखे फोटो काढायला लागलो. मी काढलेला पहिला फोटो हा सनबर्ड या पक्ष्याचा होता. मी असे फोटो काढत असताना तो मात्र निवांत बसला होता. मी त्याला म्हणल की अरे तू पण काढ की फोटो. तर तो म्हणाला की अरे हा अगदी कॉमन आहे आणि कुठेही दिसतो आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. खरच की...! या पक्ष्याला मी अनेक वेळा पाहिलंय. घराच्या मागे असणाऱ्या बागेत किती तरी वेळा फुलातून मध काढण्यात गुंतलेला असतो. पण मी नुसते पाहिले होते, मात्र आता निरीक्षण करत होतो. 

Purple sunbird (male) | The purple sunbird (Cinnyris asiatic…

Copyright: Sammil

आता तुम्हाला सुद्धा वाटेल की हा पक्षी तर आपण पाहिला आहे. मित्राने सांगितलं की हा नर आहे. त्याच्या मागच्या फांदीवर बसली आहे ती मादी. मी त्याला विचारले की "हे तू कसे काय ओळखलेस?",. तर त्यावर तो म्हणाला की, "कोणत्याही पक्ष्यांमध्ये नर हा जास्त सुंदर असतो. याचे कारण म्हणजे त्याला मादीला impress करायचे असते आणि इतर नरांपासून जिंकून घ्यायचे असते". मादी पाहिल्यावर मला त्याचे बोलणे पटले. 

Purple Sunbird - Cinnyris asiaticus female adult - sisu139642

Copyright: Singhal Sunil
  
किती फरक आहे बघा नर आणि मादीमध्ये पण हाच सुंदर नर या मादीला आकर्षित करून घेतो आणि मग ते दोघा मिळून घरटे बांधतात आणि संसार करतात. पक्षी निरीक्षणाची नेमकी सुरुवात कुठून करायची असा प्रश्न आता तुमच्यापुढे असेल. त्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर देतो पण या ब्लॉगमध्ये नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये. थोडा सस्पेन्स राहूदे की. तोपर्यंत तुम्ही स्वर्गीय नर्तकाचा काही फोटो दाखवतो. आश्चर्य वाटेल पण हा पक्षी सिंहगडाच्या पायथ्याला दिसतो बर का!! 

File:Indian paradise flycatcher Bangladesh.jpg - Wikimedia Commons

हा नर आहे


Indian Paradise-Flycatcher - eBird

Asian Paradise Flycatcher (Terpsiphone paradisi) | Beautiful birds ...
एक सुखाचा संसार


पुन्हा भेटण्याआधी तुम्हा सर्वाना एक होमवर्क देतो. आपल्या घराच्या आजूबाजूला काही छोटे सुंदर पक्षी आढळतात. त्यांची नावे सर्च करून फोटो नक्की बघा. 

1. Tailorbird - शिंपी
2.  scaly breasted munia
3. Indian Magpie Robin - दयाळ
4. Green Bee-eater - वेडा राघु
5. Indian Grey Hornbill - करड्या रंगाचा धनेश 
6. Ashy Prinia - वटवट्या 
7. Coppersmith Barbet - तांबट
8. Oriental White-eye - चष्म्या
9. Golden Oriole - हळद्या
10. Shikra

टीप - 

महाराष्ट्रातले काही पक्षी आणि त्यांची माहिती वाचायची असेल तर माझाच एक ब्लॉग आहे तो नक्की वाचा.. 

तळ टीप - इथे दिलेले फोटो हे मी काढलेले नाहीत. केवळ तुम्हाला ते बघताना छान वाटावेत म्हणून आंतरजालावरून घेतले आहेत. माझ्या फोटोंचा वेक वेगळा ब्लॉग लिहेन.

_______________________________________________________________________________

आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने घेऊन आलो आहोत ५ दिवसांचा दुर्ग ऑनलाईन दुर्अगभ्यास वर्ग. 

हा दुर्ग अभ्यास वर्ग घेणार आहेत डॉ. सचिन जोशी. सचिन जोशी यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर PHD केली आहे तसेच त्यांनी काही अंधारात असलेल्या किल्ल्यांचा शोध सुद्धा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेतून किल्ले समजून घेणे हे महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींच्यासाठी पर्वणीच आहे. हा अभ्यास वर्ग दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असा होईल. याची वेळ संध्याकाळी ७.३० ते ९ अशी असेल. यात तुम्हाला जोशी सरांना प्रश्न देखील विचारता येतील. यासाठीचे शुल्क हे रुपये ५०० आहे

इच्छुक असलेल्या सर्वांनी ८७९३१६१०२८ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर Whats app वर संपर्क करावा आणि आपली सीट लवकरात लवकरत बुक करावी. कारण जागा या मर्यादित आहेत आणि अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि हो जे नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आमच्या इतिहासाच्या शाळेची एक महिन्याची मेम्बरशीप मोफत आहे.  


© 2020, Shantanu Paranjape

You Might Also Like

4 comments

 1. खुप छान माहिती शंतनु ������ मी ५०+ पक्षी पाहिले आहेत पण खर्या अर्थाने अजुनही पक्षी निरीक्षण सुरू केलेले नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. नक्की कर मग सुरु!! तुला तशीही आवड आहेच त्यामुळे कुणाची गरज लागणार नाही!!

   Delete
  2. हो नक्कीच, जमल्यास जाऊ आपण एकत्र :)

   Delete
 2. मस्त लिहिला आहेस ब्लॉग. Paradise flycatcher च्या 2 फोटोंमध्ये तू हा नर आहे असं लिहिलं आहेस. नवशीक्यांचा घोळ होऊ शकतो.

  ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });