दुर्गराज रायगड - वेदांत भागवत

  • December 29, 2016
  • By shantanu paranjpe
  • 0 Comments

दुर्गराज रायगड दुर्गांमध्ये जेष्ठ | सर्वांत राहुनी अलिप्त || 
राजनीतीत म्हक्लीष्ट | तो राय दुर्ग श्रेष्ठ ||


         दुर्गांचा राजा म्हणून या रायगडला संबोधले जाते.या वर वेगळ लिहिण्याची मला फारशी गरज नाही, पण परवाच गडावर जाणं झाल्यामुळे, लिहाव काहीतरी ! अस प्रकर्षाने वाटलं. मुळात रायगड परिचित नाही अशी व्यक्ती निदान महाराष्ट्रात तरी शोधून सापडणे अवघड आहे. संभाजी राजे म्हणालेले राजांशिवाय रायगड ही कल्पनाच करणे अवघड आहे. किल्ला कसा बांधावा याचे उत्तम उदहरण म्हणजे रायगड चे बांधकाम. राजेशाही थाटातला एक लढाऊ किल्ला असाच आपल्याला रायगड चा उल्लेख करावा लागेल ! याच किल्ल्याला कोण एका ब्रिटीश अधिकाऱ्याने fort of mystery अस म्हटल आहे. आपल्याला सुद्धा अनेक वेळा या किल्ल्याबाबत खूप गोष्टी रहस्यमय वाटतात.

           अनेक प्राचीन दंतकथा आपल्याला या किल्ल्याच्या बाबतीत ऐकायला मिळतात. या दंतकथा कितपत खऱ्या खोट्या आहेत हे कळायला मार्ग नाही पण ऐकीव माहिती कुठेतरी खरी असल्यासारखी भासते. एक उदहरण म्हणून; एक दंत कथा महाड च्या आसपासच्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे ती म्हणजे महाडचे ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराजांच्या मंदिरात असलेल्या कासवाच्या खाली एक भुयार आहे ते रायगडला जाऊन मिळते . प्रत्यक्षात ते रायगडावर कुठे जाऊन पोचते, हे माझ्या माहितीत नाही. पण विरेश्वर महाराजांच्या मंदिरातल्या कासवाच्या खाली एक भुयार आहे हे मात्र निश्चित. तसेच अजूनही कितीतरी कथा आहेत कि ज्या खऱ्या वाटतात. तसाच भवानी टोकाच्या खालची गुहा एक रहस्यमय समजली जाते . पोचण्यास अतिशय अवघड असलेली ती गुहा पूर्वी शिवाजी महाराज ध्यानासाठी बसायला उपयोगात आणत . तिथे वाघ येतो असाही लोकांचा समज आहे . सोबतच रायगडावरील विविध शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात . प्रमुख दरवाजाच्या खाली एक घोडा आणि त्याच्या पायाखाली ४ हत्ती आणि घोड्याच्या पाठीवर एक हत्ती ज्याला घोड्याचा शेपटीरूपी साप डासण्याचा प्रयत्न करत आहे .अशा प्रकारचे चित्र असलेले शिल्प आहे . ज्याचा गूढ असाच उल्लेख करावा लागेल . कारण जरी ५ हत्ती हे ५ पातशाह्यांचे प्रतिक मानले तरी ४ पायाखाली आणि एक हत्ती वर कसा काय . त्यातून पण त्याला शेपटीरुपी साप का डासतोय ह्याचा अर्थ लागत नाही .

                 ऐतिहासिक पार्श्वभूमीवर इतका अभ्यास नसला तरी सर्वसाधारण तर्क लाऊन इतके नक्की सांगता येईल कि जेव्हा रायगडचे नुतनीकरण आणि डागडुजीला प्रारंभ झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी जवळपास ४ पातशाह्या आपल्या दहशती खाली आणलेल्या उरलेली ती एकाच उत्तरेकडची पातशाही मुघल सल्तनत . त्याला दसणारा साप म्हणजे शिवाजीन नंतरची मराठा शाही . थोडक्यात हिरोजी इंदुलकरांना असा संदेश द्यायचा असावा कि शिवाजीराजांच्या घोड्यांनी ४ पातशाह्या तर पायदळी तुडवल्या उरलेल्या एका पातशाहीला संपवायला शेपूट सुद्धा पुरेसे आहे . पण एकंदर इतिहासाचा अभ्यास केला तर मात्र हा बहामनी विरुद्ध मराठे असा वाद दिसतो बहामानीच्या राजांचा ऐशोराम, हत्तीन्चे सैन्यात असलेले महत्वाचे स्थान .ज्यामुळे बहामनी संस्थान खालसा झाले आणि मराठ्यांनी त्यावरूनच शहाणे पणा करून बहामनी राज्यांच्जे अनुकरण केले नाही म्हणून ते पातशाहयांयन्विरुद्ध लढतायत. असाही असू शकेल. थोडक्यात हा दुर्गराज हा एका गुह्याच्या कोंदणात अडकलेल्या एका हिऱ्यासारखा  आहे  आणि खऱ्या इतिहासाचा आणि या दंतकथांचा मेळ आणि त्यांचा सखोल अभ्यास हाच आपल्याला हे रहस्य उलगडण्यात मदत करू शकतो.
- वेदांत भागवत 

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });