कोल्हे दर्शन- योगेश पुराणिक

  • February 07, 2017
  • By shantanu paranjpe
  • 0 Comments


    फॉक्स पुरची मँगो वुमन..म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाईचे राहणारे श्रेयस आणि सागर, कछच्या रणचा राहणारा आशिष आणि पुण्यनगरीतील मी, असे एका शनिवारच्या सकाळी कोह्याच्या दर्शनार्थ निघालो सासवडला. पावसामुळे धरित्री ने एकदम हिरवा शालू नेसलेल्या अशा माळरानात आम्ही पोहोचलो . डावीकडे 3-4 ग्रे फ्रांकॉलिन उर्फ तितर दिसल्या. मस्त light पडला होता त्यांच्या बॅकग्राऊंडला सुंदर अशी पांढरी फुले होती. खूप छान फ्रेम्स मिळाल्या आणि आम्ही पुढे निघालो.

फ्रांकॉलिन उर्फ तितर

    लांबूनच आशिषला कॅमेऱ्यातून दिसले कि एक इगल एका डोंगराच्या कपारी वर असलेल्या फांदी वर बसलेला आहे. आम्ही साधारण अर्धा किमी फिरून हळू हळू त्याला approach केलं. आम्हाला पाहून त्याने उडू नये म्हणून हळू हळू दोघे दोघे झाडाच्या मागे लपून छपुन पुढे जात होतो. ते करत असतानाच पक्षी कुठला आहे हे ओळखण्यासाठी फोटो काढले. हि पक्ष्यांचे फोटो काढतांनाची पद्धत असते, जेणेकरून जरी पक्षी उडाला तरी आपल्याकडे त्याची नोंद/documentation राहते. फोटो पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की तो twany eagle होता. इथे एक टीप सांगतो की कॅमेरा अथवा दुर्बिणीतून साधारण पक्षी कुठे पाहतो आहे हे बघायचे. जर त्याचे लक्ष तुमच्याकडे नसेल तर हळू हळू जवळ जात राहायचे. जर तुम्ही जमिनीवरच्या पक्षाचा फोटो काढत असाल तर काही अंतरापासून crwal म्हणजे झोपत झोपत जवळ जायचे.जर तुम्ही झाडावरच्या पक्षाचा फोटो काढत असाल तर एखादे छोटे झाड लपण म्हणून वापरत हळू हळू पुढे जायचे. आता किती जवळ जायचे त्याबद्दल पण एक लक्ष्मण रेषा असत, ती अशी की पक्षी अचानक हालचाल करायला लागतो किंवा तुमच्या कडे टक लावून बघायला लागतो. अशा वेळेस तुम्ही लगेच थांबावे आणि निरीक्षण करावे. तर आता आम्ही बऱ्यापैकी जवळ पोहोचलो होतो, आहे त्या ठिकाणी थांबून पटापट फोटो घ्यायला लागलो. इगल उंचावर असल्याने माझंहे हात भरून आले होते. आमच्या अनुभवावरून आता कुठल्याही क्षणी इगल  उडेल अशी खात्री होती. 


    मी तयारच होतो आणि  त्याने भरारी घेतली. त्याचे उडणे बघून गरुड भरारी का म्हणतात ते लक्षात आले. परत एकदा टीप द्यावीशी वाटते उडणाऱ्या पक्षांचे फोटो काढण्याची. तुमचा कॅमेरा AI SERVO मोड (कॅनन कॅमेरा असला तर) वर सेट करावा. मेमरी कार्ड शक्यतो higher MBPS (extreme) प्रकारातले असावे. ह्याचा फायदा असा की फोटो काढतांना बफर मध्ये फ्रेम्स साठवल्या जातात जेणेकरून सगळी action तुम्हाला घेता येईल.
मग आम्ही परत आलो आणि कोल्ह्याच्या घरापाशी एका दगडामध्ये लपून बसलो. कोल्ह्याच घर म्हणजे जमिनी लगत केलेलं बीळ असतं. सगळ्या जणांना एकच आस लागली होती ती म्हणजे कोल्हा आणि अचानक श्रेयस हळूच म्हणाला कोल्हा. आमच्या बरोब्बर समोर च्या बाजूला डोंगरावर तो येऊन बसला होता. इतका सुंदर आणि camoflauge होता की पटकन कळत नव्हतं कि तिथे कोल्हा आहे. हळू हळू तो पुढे येत येत घराच्या दिशेने येत होता. आमच्या सर्वांचे श्वास रोखले होते...पण तेवढ्यात कसला तरी आवाज आल्याने त्याने धूम ठोकली. आम्ही तरीही शांतपणे तिथेच बसायचा निर्णय घेतला. अशा वेळेस camouflage कपडे म्हणजेच ज्या प्रदेशात तुम्ही आहेत त्याच्याशी मिळते जुळते कपडे घालावे. साधारणपणे हिरवट मातकट कपडे आणि टोपी असा पोशाख करावा आणि शांत पणे एका जागी बसून राहावे. 

  असे बसलेलो असतांना आमच्या समोरच्या दरीतून 2 ब्लॅक shouldered kite म्हणजेच कापशी घार आमच्या दिशेला उडत आल्या. पटापट काही फ्रेम्स काढल्या आणि पाहिले तर हिरव्या बॅकग्राऊंड वर पांढरी कापशी घार आणि काळे shoulder स्पष्ट पणे फोटो मध्ये दिसत होतें. काही वेळ तसेच बसून राहिलो..मधून मधून डोंबारी (लार्क) ह्याचे डिस्प्ले चालू होते. तो मधेच उंच असा वर उडायचा आणि त्याच वेगाने खाली येऊन परत वर उडायचा. हे करत असताना अतिशय मंजुळ अशी शीळ घालायचा. ह्यालाच प्रणयाराधन म्हणजेच जीवनसाथी ला रिजवणे असे म्हणतात. बराच वेळ होत आला होता म्हणून आम्ही निघायचा निर्णय घेतला ...आम्ही उठलो आणि तेवढ्यात डावीकडून कोल्हा त्याच्या घराकडे जातांना दिसला आणि आम्हाला पाहून स्तब्ध झाला. आमच्या कडे बघत असतांना मस्त अशा फ्रेम्स मिळाल्या. तो डोंगराच्या मागे गेला आणि आम्ही त्याला जास्त त्रास न देता पटकन शांतपणे मागच्या मागे गाडी कडे गेलो. माझ्या आयुष्यातील हा एक अप्रतिम दिवस होता, मला दुसऱ्यांदा कोल्हा दिसला. एकदा खूप वर्षांपूर्वी मयुरेश्वर अभयारण्यात mating करतांना दिसला होता तो अनुभव नंतर कधीतरी शब्द बद्ध करिन. ह्या सर्व दिवसाचे श्रेय आशिषला देतो.


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });