मृत माणसाला लग्नाचे निमंत्रण

  • February 06, 2017
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

   

   जिवंत माणसाला लग्नाचे निमंत्रण देतो हे ऐकले होते पण मेलेल्या माणसाला सुद्धा लग्नाचे निमंत्रण?? ऐकून विचित्र वाटले ना? साहजिक आहे पण अशा प्रकारचे उदाहरण इतिहासात दिसून येते. पारसनिस संग्रहातील कागदपत्रे वाचताना शेजवलकर यांना याचा शोध लागला आणि पुढे त्यांनी ते डेक्कन कॉलेजच्या बुलेटीन मध्ये प्रसिद्ध केले.

  शेजवलकर लिहितात,” कागदपत्रे तपासतात अचानक हळद लावलेले एक पत्र आमच्या नजरेस पडले. जरी ते सध्या कागदावर लिहिले होते तरी आम्हाला लगेच कळून आले की ती लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे. ती पत्रिका ही यजमान घरातील मृत व्यक्तीला आहे हे लगेच कळून आले.”
सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांच्या धर्मपत्नी आनंदीबाई यांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजे प्रतापसिंहाच्या लग्नासाठी ही पत्रिका लिहिली होती. प्रतापसिंह यांचे लग्न हे रामचंद्रराव मोहिते यांच्या बहिणीशी ठरविण्यात आले होते. लिहिलेली पत्रिका ही कै. रामराजे यांना उद्देशून लिहिली होती असे दिसून येते. 
प्रतापसिंह यांचे लग्न रामचंद्रराव मोहिते यांच्या दोन्ही बहिणींशी करण्यात आले होते. अर्थात मोठी बहीण वारल्यानंतरच हे दुसरे लग्न करण्यात आले. ही अशी पद्धत सर्वच मराठा घराण्यांमध्ये होती का हे कळण्यास मात्र मार्ग नाही. शेजवलकर लिहितात की * चिन्ह असलेले वाक्य हे स्वतः आनंदाबाई उर्फ माईसाहेब यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील मोडी लिपीत लिहिले होते.You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });