उन्हाळ्यातील भटकंतीमुलांच्या परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्टी लागली. सगळीकडे आता plans चालू आहेत की नेमके भटकायला जायचे तरी कुठे? तर हे सुट्टीचे दोन महिने मस्त पैकी घालवता येतील अशी अनेक ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे थोडी अभ्यासपूर्ण भटकंती केली तर? उन्हाळ्यातील भटकंतीसाठी आपल्याकडे अनेक उपलब्ध पर्याय आहेत जसे की किल्ले, लेणी, जुनी मंदिरे आणि अभयारण्ये. प्रत्येकाचे एक स्वतःचे वैशिष्ट्य आहे.


किल्ले- खरे तर उन्हाळी भटकंतीमध्ये गड-किल्ले शक्यतो टाळावेत कारण उन्हाचा त्रास आणि पाण्याची कमतरता. पण वाटेवर गर्द झाडी असणारे वासोटा, कर्नाळा, अवचितगड यांसारखे किल्ले जरूर करावेत. म्हणजे ट्रेक पण होईल आणि करवंद इत्यादी रानमेव्याची मजा सुद्धा लुटता येईल. 

करवंदांचा  रानमेवा (photo Courtesy- Google)
कर्नाळा किल्ला 

लेणी- उन्हाळ्यात भटकंतीचा एक उत्तम पर्याय म्हणजे लेणी. सह्याद्रीच्या कातळाला सौंदर्याचा मुलामा चढवला तो या कातळात कोरलेल्या लेण्यांनी. प्राचीन इतिहासाचा ठेवा जपत ही आजही उभी आहेत. अजिंठा-वेरूळ, कार्ला यांच्यासारख्या प्रसिद्ध लेण्यांबरोबर येलघोल, गोमाशी, शिरवळ यांच्यासारखी निसर्गाच्या रम्य अधिवासात असलेली लेणी सुद्धा आवर्जून पहावीत. या भटकंतीचा फायदा असा की प्राचीन ठेवा पाहायला मिळतोच पण बाहेरील गरम वातावरणात आत असलेला थंडावा सुखावून जातो.  

बेडसे लेणी 

औरंगाबाद लेणी 

मंदिरे-
महाराष्ट्र हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तो केवळ या प्रांतात असणाऱ्या विविध प्राचीन मंदिरांमुळेच. सर्वसामान्य लोकांमध्ये ओळखली जाणारी हेमाडपंथी शैलीमधील मंदिरे असोत किंवा शिलाहारकालीन, चालुक्यकालीन मंदिरे असोत. ही सर्व तीर्थस्थाने भक्तीरसासोबतच शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणून ओळखली जातात. मूर्तींच्या चेहऱ्यावरील बोलके भाव, मुर्तीवरील आभूषणे, पुराणातील गोष्टी इत्यादी गोष्टी अगदी बारकाईने कोरलेल्या दिसतात. महाराष्ट्रात असणारी गोंदेश्वर, खिद्रापूर, अंबरनाथ, भुलेश्वर येथील मंदिरे म्हणजे तर एक अनमोल ठेवाच आहे. या ही तीर्थस्थाने पाहण्यासाठी काही विशेष कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत त्यामुळे अगदी सहकुटुंब अशी ट्रीप होऊ शकते. 

वाघेश्वर मंदिर, वाघेश्वर 
बहादूरगडचे भग्न मंदिर  

अभयारण्य-
ताडोबा अभयारण्यात मोकळा फिरणारा जंगलाचा राजा वाघ कुणाला आवडत नाही. मे महिन्याच्या सुमारास रानातील पाणीसाठा संपल्याने हे सर्व प्राणी-पक्षी पाणवठ्याजवळ येतात आणि त्यांचे मस्तपैकी दर्शन आपल्याला होते. ताडोबा, मेळघाट, फणसाड इत्यादी अभयारण्यात अनेक हौशी पर्यटक आवर्जून भेट देतात. जंगल अनुभवायचे असेल तर एका तरी अभयारण्याची भटकंती मस्ट.

हरिश्चंद्र गड -कळसुबाई अभयारण्य 
कर्नाळा अभयारण्य 

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });