पेशवाईतील सांकेतिक लिपी

  • August 21, 2017
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

पेशव्यांचा इतिहास हा काही प्रमाणात मजेशीर सुद्धा आहे हे पेशवे दफ्तर वाचताना जाणवले. पेशवे दफ्तरातील कागदपत्रे या ग्रंथाच्या २२ व्या खंडात १५५ पृष्ठ क्रमांकावर एक पत्र आहे. त्याचे मूळ मोडी पत्र त्याच खंडाच्या सुरुवातीला छापले आहे! (दोन्ही पत्रे खाली देत आहे!!) त्या पत्रातली भाषा सांकेतिक आहे हे सहज कळून येते. कसल्यातरी खर्चाचा तपशील यात असावा असा अंदाज त्यात असणाऱ्या आकड्यांवरून लागतो, हे उघड असले तरी ही लिपी नेमकी काय आणि तिचा उलगडा कसा करायचा हे काही समजत नव्हते!! इतक्यात दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक संकीर्ण खंड वाचत असताना त्या श्री. ना. स. इनामदार (राऊ कादंबरीचे लेखक) यांचा लेख वाचण्यात आला. त्यात त्यांनी ही लिपी उलगडून दाखवली आहे!! मोठी मजेशीर आहे!!


मूळ मोडी पत्र

पत्राचे लिप्यंतर
वर पहिल्या फोटोमध्ये ते मूळ मोडीपत्र दिले आहे तर खाली त्याचे लिप्यंतर!! ना. स. इनामदार ही लिपी वाचण्याचे काही नियम सांगतात ते असे-
·    
     १) प्रत्येक नोंदीचे नऊ अक्षरांचा एक असे खंड पाडावे

     २) प्रत्येक खंडातील शेवटचे एक अक्षर सामान्यतः मनाचे भाकड वापरले आहे. हे खोटे अक्षर व्यंजनाच्या अनुक्रमाने येते. जसे की क. ख, ग, घ. सवयीने हे अक्षर चटकन ओळखता येते. हे अक्षर गाळावे म्हणजे ८ अक्षरे उरतील

     ३) अ आ इ इत्यादी स्वरांसाठी ‘ध’च्या बाराखडीचा उपयोग करावा

     ४) मूळ संकेतीक लिपीतील नोंदिमधील अक्षरे पुढे दिलेल्या अनुक्रमाने मांडून घ्यावी. १=२, २=४, ३=८, ४=६ ५=१, ६=३, ७=५, ८=७. शेवटचे अक्षर सोडायचे आहे. म्हणजे पहिले अक्षर दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर न्यायचे आहे)

    ५) अक्षरक्रम बदलून झालेल्या नव्या नोंदीमधील अक्षरांच्या जागी खाली दिलेल्या प्रमाणे बदल         करावा

                              नव्या नोंदीतील अक्षरे-

                 क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध

                 न प फ ब भ म  य र ल व श ष स ह ळ क्ष

     ६) जोडाक्षरांचा संकेत तीन प्रकारचा आहे


1.       वरील अक्षरसंकेत जसाच्या तसा वापरणे
2.       जोडाक्षर सुटे लिहिणे. जसे त्र ऐवजी तर
3.       अर्धे अक्षर कंसात टाकणे


मूळ पत्रातील मजकूर वर फोटो मध्ये दिला आहेच. तरी हा मजकूर खालील प्रमाणे

1.       ण या जे झु ही त झ ख ख
2.       टी ना झ ते ता डी नी ध गा
3.       था यी णी जे का यं झा ले धी
4.       न वे न ठ ट भ ठा जा ची
5.       हा क ता धा झ धा जा झा छु
6.       न जा ट ह हे झ भे ण जू

7.       ही न टे टी छा ण ठा ने झे छ २२ जिलकाद


आता त्याचे रूपांतर नवीन मजकुरात कसे होते ते पाहू.

नियम २ प्रमाणे शेवटचे अक्षर गाळायचे आहे, म्हणजे आपल्याकडे आठ अक्षरे राहतात

1.       ण या जे झु ही त झ ख 
2.       टी ना झ ते ता डी नी ध 
3.       था यी णी जे का यं झा ले 
4.       न वे न ठ ट भ ठा जा 
5.       हा क ता धा झ धा जा झा 
6.       न जा ट ह हे झ भे ण 

7.       ही न टे टी छा ण ठा ने 

नियम ४ नुसार अक्षरांची अदलाबदल केल्यास आपल्याला खालील नवी नोंद दिसून येते!


1.       ही ण त या झ झु ख जे
2.       ता ठी डी ना नी टे ध झ
3.       का था यं इ झा जे ळे णी
4.       ट न भ वे ठा ठ जा न
5.       झ हा धा क जा धा झा ता
6.       हे न झ झा भे ह ण ट
7.       छा ही ण त ठा टी ने हे


आता शेवटच्या नियमाप्रमाणे नवीन अक्षरे टाकली की आपल्याला खालील मजकूर मिळून जातो

तीस हजार रुपये
 हाली शिका किले सर
नाळा जंजिरा येते सि
लकच ठेवाव या क
रता आनया बा राहा
तेकर याचे तसल
मातीस हवाली केले

हे असले काही वाचले की उगाचच एनिग्मा मशीन आठवते. जरी ब्रिटीश लोकांनी त्याला डीकोड केले असले तरी ते मशीन बनवणे हे काही सोपे काम नव्हते!! कदाचित तसेच काम काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुसऱ्या बाजीरावच्या वेळेस झाले असावे. अर्थात याचा कर्ता कोण हे आपल्याला माहिती नाही परंतु ज्याने कुणी केले आहे त्याला मनापासून सलाम द्यावासा वाटतो!! आणि हो, ट्युरिंग प्रमाणे हा कोड डीकोड करणाऱ्या ना. स. इनामदार यांना पण hats off!!!! 


 संदर्भ- पेशवे दफ्तर खंड २२
       ऐतिहासिक साहित्य संकीर्ण खंड ११ (भा. इ. सा. मंडळाने प्रकाशित केलेल्या या खंडातील ना. स. इनामदार. यांचा हा लेख)

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });