पानिपतात अब्दालीचे सुद्धा तितकेच नुकसान झाले होते!!

  • November 16, 2018
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments[डावीकडे अहमदशाह अब्दाली आणि उजवीकडे सदाशिव राव भाऊ पेशवे- फोटो-गूगल] 


   आजच्याच तारखेला काही वर्षांपूर्वी भारत इतिहासातला एक मोठ युद्धसंग्राम झाला आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. पण या युद्धात मराठे प्राणपणाने लढले आणि अमर झाले. गोविंदाग्रज अर्थात रा.ग.गडकरी यांनी पानिपतचे यथार्थ वर्णन केले आहे ते असे,

कौरव पांडव संगर तांडव द्वापारकाली होय अति
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती

इतिहासकार ग्रॅण्ट  डफ हा मराठा सैन्याचे वर्णन करताना लिहितो की, 

"The lofty and spacious tents, lined with silks and broad cloths, were surmounted by large gilded ornaments, conspicuous at a distance... Vast numbers of elephants, flags of all descriptions, the finest horses, magnificently caparisoned ... seemed to be collected from every quarter ... it was an imitation of the more becoming and tasteful array of the Mughuls in the zenith of their glory."  [संदर्भ-  The fall of the Mughal Empire of Hindustan- Chapter VI] 

पानिपतचे युद्ध हे अद्भुत आहे. परकीय साम्राज्याने भारतावर आक्रमण करू नये म्हणून सह्याद्रीने देशासाठी केलेला त्याग असेच मी त्याचे वर्णन करेन. अब्दालीला हरवणे आणि भारतात परकीय सत्ता स्थापन होऊ ना देणे या एकाच उद्देशाने भाऊंच्या नेतृत्वाखाली सुमारे १५०० किमीचे अंतर पार करून एक लाख मराठा फौज पानिपतवर लढली. सारेच अद्भुत!! दुर्दैवाने भाऊ पडले आणि दुपारच्या प्रहरापर्यंत जिंकत आलेले युद्ध मराठ्यांनी गमावले. या युद्धात एक लाख बांगडी फुटली आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागले.  
   १४ जानेवारी १७६१, अफगाणचा बादशहा अहमदशाह अब्दाली आणि मराठी फौजेचा अधिपती सदाशिवराव भाऊ यांच्यात हे युद्ध झाले आणि त्यात अब्दालीचा विजय झाला. वि.का.राजवाडे यांच्या मते या युद्धात, सदाशिवराव भाऊंच्या सैन्याचा खर्च साधारण १ कोट आला असावा. (खंड.१, टीप २८७). बखर करांच्या मते हा खर्च एकूण ३ कोट झाला असावा. अर्थात पेशव्यांना त्याचे ओझे काही फार वाटले नसावे. या युद्धात पेशव्यांचे जितके नुकसान झाले तितकेच नुकसान अब्दालीचे झाले, किंबहुना जास्तच. त्यामुळे विजय मिळवून सुद्धा त्याचा उपभोग घेण्याचे नशीब त्याच्याजवळ नव्हते.
  त्याच्या या स्वारीत त्याच्या स्वताच्या सैन्याचा प्रचंड संहार झाला. पानिपतच्या शेवटच्या दिवशी सुद्धा त्याच्याकडील बरीच माणसे मारली गेली. मात्र रोहिल्यांना पुढे करून त्याने स्वतःचा बचाव केला त्यामुळे रोहिले मात्र कामास आले. एकंदरीत या त्याच्या उद्योगामुळे लाभापेक्षा नुकसानच जास्त झाले. मराठे पराभव झाल्यानंतर दिल्ली सोडून गेले आणि अब्दाली युद्धानंतर सातव्या दिवशी दिल्लीमध्ये आला. यानंतर सुमारे दीड-दोन महिने त्याचा मुक्काम दिल्लीमध्ये होता. याकाळात थोडेफार स्थिरस्थावर करायचा प्रयत्न त्याने केला. परंतु या काळात त्याचे अनेक सरदार त्याला सोडून गेले आणि तिथल्या लोकांमध्ये, “पेशवे स्वतः येऊन सर्व बंदोबस्त करतील” अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे त्याला पुढचा मार्ग संकटमय वाटू लागला. “भगवतकृपेवरून श्रीमंतांचे राज्य कायम आहे,[१. २८२] याउपरी ईश्वरे दिवस उत्तम आणिले, उगवते दिवस आलेले दिसते.[६. ४१२] युद्धच आहे, जयपराजय ईश्वराधीन असते” अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. (संदर्भ- मराठी रियासत- सरदेसाई).
   त्यामुळे युद्धात पराजय होऊन सुद्धा लोकांचा पाठींबा पेशव्यांना होता हे बघून अब्दालीला भारतात अजून राहणे अवघड वाटू लागले. त्यातच दोन वर्षाचा पगार चुकवावा असे म्हणून त्याच्या सैन्याने दिल्लीत बंड केले. त्यामुळे नाईलाजाने त्याने नजीबखानकडून सुमारे ४० लक्ष रुपये उधार घेतले. तो भारतात असताना अफगाण मधील त्याच्या साम्राज्यावर इराणी फौजेने हल्ला केल्याची बातमी त्याला मिळाली आणि हा प्रसिद्ध माणूस इसविसन १७६१, २२ मार्च रोजी दिल्ली सोडून निघाला. त्यामुळे हिंदुस्तानात लोडाला टेकून बसण्याची त्याची इच्छा अपुरीच राहिली.
   पुढे याच सुमारास पंजाबात शिखांनी जोर धरला आणि लाहोर काबीज केले, शिखांचा पाडाव करण्यासाठी हा माणूस लाहोरला आला आणि शिखांचा पराभव त्याने केला परंतु तो गेल्यावर शिखांनी पुन्हा एकदा लाहोर जिंकून घेतले. एकाचवेळी शीख आणि मराठे हे दोन भयंकर शत्रू त्याला झेपेनासे झाले म्हणून त्याने चक्क मराठ्यांशी तहाची बोलणी सुरु केली. १७६३ मध्ये त्याचे दोन वकील महाराष्ट्रात येऊन राहिले आणि पुढे आधी जसा अंमल मराठ्यांचा होता त्याप्रमाणे राहिलं, अश्या करारावर पेशव्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठी आणि अब्दाली यांच्यातील ‘गोडवा’ फारच वाढला! परंतु शिखांनी मात्र पंजाबातून अब्दालीचे उच्चाटन केले ते कायमचेच. तपानिपतच्या युद्धानंतर हाती काहीही न लागता हा पुरुष इसवीसन १७७२ मध्ये चमननजीक मरण पावला.      


संदर्भ- १. मराठी रियासत मध्य विभाग तीन(पानिपत प्रकरण सन १७५०-६१)- गोविंद सखाराम सरदेसाई 
मेजर इव्हान्स बेल याने पानिपत बद्दल काढलेले उद्गार [संदर्भ- पानिपत १७६१- शेजवलकर]


अब्दालीने सवाई माधोसिंगाला जे पत्र पाठवले त्यात मराठ्यांची केलेली स्तुती! [संदर्भ- पानिपतचा रणसंग्राम- निनाद बेडेकर]  
वर दिलेल्या पत्राचा पूर्ण उल्लेख प्रणव महाजन याने त्याच्या इतिहासातील सत्याच्या मार्गावर या ब्लॉग वर केला आहे. तर त्याची ही लिंक


ब्लॉगवरील काही इतर लेख - 
____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });