आनंदीबाई ओक यांचे माहेर

 • December 25, 2019
 • By Shantanu Paranjape
 • 7 Comments


   पेशवे घराण्यातील गाजलेल्या स्त्रियांपैकी आनंदीबाई या एक. पेशवे दप्तरातील कागदपत्रे या गो. स. सरदेसाई यांनी निवडलेल्या मोडी कागदपत्रांच्या एक खंडात आनंदीबाई यांच्या बद्दलची अनेक कागदपत्रे छापली आहेत. ‘आनंदीबाई यांची दिनचर्या’ अशा नावाने तो खंड आहे. त्याच्या प्रस्तावनेत संपादक म्हणतात की, ‘ऐतिहासिक गोष्टींच्याबद्दल असलेल्या रूढ समजुती व काढलेले निष्कर्ष यांचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्यास अस्सल कागदपत्रांचा उपोयग होतो हे आनंदीबाई यांच्या बाबतीत विशेष महत्वाचे ठरते.

आनंदीबाई यांचे माहेर हे ओकांचे. म्हणजे आजवर आनंदीबाई यांच्याबद्दल जे लेख लिहिले गेले त्यात सरसकटपणे आनंदीबाई या गुहागर येथील ओकांच्या असेच लिहिले गेले परंतु हे ओक घराणे खुद्द गुहागरचे नसून गुहागर जवळील मळण गावातील होय. हे गाव गुहागर पासून २० किमी अंतरावर आहे व सध्याच्या गुहागर तालुक्यात मोडते. आनंदीबाई यांची दिनचर्या, सयाजी ज्ञानमालेने प्रसिद्ध केलेले आनंदीबी यांचे चरित्र किंवा गो. स. सरदेसाई यांनी छापलेल्या ‘ऐतिहासिक व्यक्तींच्या वंशावळी’ या पुस्तकात सुद्धा आनंदीबाई या गुहागर येथील असल्याचे सांगितले आहे. परंतु ज्ञानकोशात मात्र आनंदीबाई या मळणकर ओक यांची कन्या असे दिले आहे. खरे तर सर्व ओक हे गुहागर जवळ असणाऱ्या पालशेत गावचे, पुढे एका कुटुंबाला पालशेत गावची देशमुखी मिळाली आणि सरंजाम म्हणून आठ गावे दिली गेली. त्यात मळण हे गाव होते. पालशेत येथून या आठ गावात ओकांची कुटुंबे गेली.

वंशावळीत लिहिल्याप्रमाणे राघो महादेव हे आनंदीबाई यांचे वडील. राघो महादेव हे कारकून, शिलेदार  होते त्यामुळे बहुतांश वेळा ते घाटावर असत. राघो महादेव यांना नारोपंत नावाचा एक मुलगा होता. भा. इ. स. मंडळाच्या त्रैमासिकात छापल्या गेलेल्या श्री. पां. न. पटवर्धन यांच्या ‘कित्येक नवे शोध’ या लेखात ‘रघुनाथराव ओक यांना औरस मुलगा नव्हता म्हणून त्यानी बाबुराव यांना दत्तक घेतले’ हे विधान सर्वस्वी गैर आहे. सरदेसाई यांनी छापलेल्या वंशावळीत आनंदीबाई यांच्या भावाचे नाव हे गणपतराव असे दिले आहे. परंतु या नावाचा पुढे काही पाठपुरावा नाही असे ‘ओक घराण्याचा इतिहास’ या पुस्तकात दिले आहे. आनंदीबाई यांना एक दत्तक बंधू होता यावर सर्वांचे एक मत आहे. फक्त आनंदीबाई यांच्या सक्ख्या भावाचे नाव काय यावर अनेकांची मते वेगळी आहेत. 

नासिक येथील तीर्थोपाध्याय यांचाकडे असलेल्या माहितीनुसार राघो महादेव यांना नारोपंत आणि गोपाळराव असे दोन औरस मुलगे होते. परंतु हा गोपाळ नाव असलेला बंधू कदाचित लहान वयात वारला असावा कारण पेशवे दप्तरातील कागदपत्रे च्या चौथ्या खंडात आनंदीबाई यांनी भाऊबीजेसाठी आपल्या भावांना आणण्यास कोपरगावाहून माणसे व पोशाख धाडले. तसेच भाऊबीजेला नारोपंत आणि नासिक येथील एक चुलता असे आले असे उल्लेख मिळतो. यात गोपाळराव तसेच दत्तक बंधू बापूराव यांचा कुठेही उल्लेख मिळत नाही. त्यामुळे राघो महादेव हे आनंदीबाई यांचे वडील. पुढे त्यांना तीन औरस मुले. आनंदीबाई, गोपाळराव आणि नारोपंत. त्यातील गोपाळराव हे लहानपणी वारले असावेत पुढे नारोपंत सुद्धा फार जगू न शकल्याने घराणे चालू राहावे यासाठी म्हणून बाबुराव या आपल्याच घराण्यातील चुलत्याला राघो महादेव यांनी दत्तक घेतले असे समजते. ही सर्व नाती समजावीत म्हणून खाली वंशावळ देत आहे.

आनंदीबाई पुढे यांनी आपल्या दत्तक भावासाठी म्हणून काही इनाम मिळवून दिले. ते अगदी इनाम कमिशन पर्यंत चालू होते. पुढे इंग्रजांच्या आमदानीत त्यांना पेन्शन मिळू लागले. बाबुराव ओक यांची मुले पुढे बरीच भांडकुदळ निघाली. यामुळे घराण्याचे फार नुकसान झाले. या या बापूंचा मोठा चिरंजीव माधवराव ओक हे सन १९१४ पर्यंत हयात होते. माधवरावांचा मुलगा विनायकराव यांनी पुढे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये चित्रकला शिकवत असत. ते सन १९११ मध्ये वारले. यांना दोन मुले. पैकी विश्वनाथ विनायकराव हे मुंबईत वकील होते. बापूराव ओक यांची आई म्हणजे काकूबाई ओक अर्थात आनंदीबाई पेशवे यांची आई. त्यांना सालिना ५००० रुपये मिळत असत. अर्थातच बाबुराव ओक हे आनंदीबाई यांच्यावर अवलंबून होते असे नाही. आनंदीबाई ओक यांच्या माहेरची फारशी माहिती कुठे दिलेली आढळून येत नाही म्हणून ती इथे देण्याचा हा एक प्रयत्न.

संदर्भ – १. ओक घराण्याचा इतिहास – श्री. भ. प्र. ओक.
       २. त्रैमासिक वर्ष ४ अंक १-४ कित्येक नवे शोध हा पटवर्धन यांचा लेख  
       ३. ऐतिहासिक व्यक्तींची वंशावळ - गो. स. सरदेसाई
       ४. पेशवे दप्तरातून निवडलेले कागद खंड ४ – गो. स. सरदेसाई 


© 2018, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

इतिहासाची आवड आहे अशा लोकांसाठी मेम्बर्स ओन्ली (paid subscription) असा ग्रूप आम्ही तयार करत आहोत!

अर्थात पेजवर पोस्ट लिहिणे चलूच राहील परंतु पेजवर अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे शक्य होत नाही जे आम्हाला मेम्बेर्स ओन्ली वर शक्य होईल!

तसेच या ग्रुपमध्ये भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाची संगतवार माहिती दिली जाईल, ब्रिटीश कालीन फोटो, जुनी पुस्तके, जुन्या मासिकातील उत्तमोत्तम लेख अशा कमाल लेखांची मेजवानी असेल. पेशवे पेज आणि ग्रुप या दोन्हीवरील लेख हे वेगवेगळे असतील. तसेच इतिहास, भूगोल आणि भटकंती या विषयी आपल्याला असणाऱ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तिथे आपल्याला दिली जातील.

पहिल्या १०० सभासदांसाठी चार्सेसमध्ये सवलत सुद्धा असेल त्यामुळे ज्यांना ज्यांना रस आहे अशांनी Whats app वर संपर्क करा~~

संपर्क - ७०२०४०२४४६

____________________________________________________________________________


मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh


x

You Might Also Like

7 comments

 1. उत्कृष्ट माहिती शंतनुजी....

  ReplyDelete
 2. The information is good. I want to know how and when she died? What happened to her etc.

  ReplyDelete
 3. आनंदीबाई यांच्या माहेरचे घर दर्शविणाऱ्या फलकचा वेध घेत आम्ही गुहागरजवळ डिसेंबर २०१५ मध्ये भेट दिली होती. तिथे एक पडिक विहीर शिल्लक आहे/होती. मूळ घराचे कोणतेही लवलेश नाहीत. आनंदीबाई घराजवळील एका मंदिरात दर्शनाला जात असत, हा उल्लेख पाहून आम्ही देखील तिथे गेलो होतो. तिथे पाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ठ नमूना पाहायला मिळाला. तो आवर्जून पाहण्यासारखा आहे.

  ReplyDelete
 4. Ata ka karayacha hey vachun?

  ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });