इंग्रजांनी काढलेली किल्ल्यांची चित्रे

  • December 31, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

इंग्रज आणि documentation यांचे एक वेगळेच नाते आहे. जिथे जिथे इंग्रजांनी आपल्या वसाहती तयार केल्या तिथल्या सर्व प्रदेशांच्या नोंदी त्यानी उत्तम प्रकारे केल्या. महाराष्ट्रात अर्थातच इंग्रज होते. या काळात अनेक इंग्रज प्रवाशांनी, इंग्रज अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र फिरला. या फिरस्तीमध्ये त्यांनी अनेक स्थळांची चित्रे काढली. यात लेणी, किल्ले यांचा समावेश होता. या ब्लॉगमध्ये आपण पाहूया इंग्रजांनी काढलेली काही निवडक चित्रे.

1. गाळणा किल्ला - 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. नाशिक व धुळे यांच्या सीमारेषेवर असलेला हा किल्ला धुळेपासून अधिक जवळ आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे याठिकाणी भरपूर वर्दळ असते.

Gaulnah fort drawn from the Northward D. 1/4' [quarter]' of a mile.' 1795 (Artist - John Johnson)


2. वसई किल्ला - 

वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती. चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव येथे करून त्यांची सत्ता उत्तर कोकणातून उखडून टाकली.

'View in Basseen Fort'. Captain James Barton's 12 Views of Hill Forts in the Western Ghats near Bombay, London, c.1820. Pl. 7.


3. पुरंदर किल्ला - 


पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़.  दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ सह्याद्रीतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.


Hill Fort, Poorandhur - Nash, Alexander (fl. 1834-1846)4. सातारा किल्ला - 


अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे.गावातून गडावर जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. मराठा साम्राज्याची राजधानी सातारा किल्ल्यावर शाहू राजांच्या काळात होती. हा किल्ला छत्रपतींची खासगी मालकी आहे. 


Satara. Bare landscape with fort on hilltop; bungalow at foot of hill - Bellasis, George Hutchins (1807-1862)५. माहुली किल्ला - 

माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आसनगाव जवळ वसलेला आहे. माहुली, भंडारदुर्ग आणि पळसगड अशा तीन दुर्गानी मिळून हा एक किल्ला झाला आहे. किल्ल्याची चढाई तशी अवघड असून गडाच्या खाली घनदाट जंगल आहे. गडावर चढाईसाठी अनेक सुळके आहेत.

Hill Fort of Bhow Mullen'. Captain James Barton, 12 Views of Hill Forts in the Western Ghats near Bombay, London, c.1820. Pl.1.६. कर्नाळा किल्ला - 


कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून साधारण १० किमी अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर आहे. त्याच्यावर असणाऱ्या अंगठ्या सारख्या सुळक्यामुळे कर्नाळा दुरून देखील ओळखता येतो. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य देखील असल्याने पावसाळ्यात व थंडीत येथे पर्यटकांची बरीच गर्दी असते. किल्ला चढायला अतिशय सोपा आहे. 

Hill Fort of Kurnallah - Ackermann, Rudolph (1764-1834)


७. विशाळगड किल्ला - 


विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.पुण्याहुन कराडला गेल्यालर पुढे पाचवड फाटा,तेथुन उजवीकडे वळल्यावर २० किमी वर शेडगेवाडी गाव लागते.डावीकडे वळल्यावर ४ किमीवर केकरुड गाव लागते.नंतर नदीवरील पुल ओलांडल्यावर लगेच उजवीकडे वळा.केकरुड घाट,मलकापुर ला कोल्हापुर रत्नागिरी हायवे वर आंबा गावातुन डावीकडे विशाळगडाकडे वाट जाते.

Hill Fort of Veshallgheen'. Plate 1 from Eight Most Splendid Views of India, sketched by an officer in the Indian Army, drawn and printed by Baron A. Friedel, London, 1833


८. प्रतापगड - 

जावळीच्या निबिड खोऱ्यात वसलेला हा किल्ला अफजलखान वधाच्या घटनेमुळे प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर पासून जवळ असलेला हा किल्ला सुद्धा छत्रपतींची खासगी मालकी आहे. गडावर गाडी जात असल्याने पर्यटकांची इथे सतत वर्दळ असते.


View from the fort of Pratapgarh - Carpenter, William (1818-1899)© 2019, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

इतिहासाची आवड आहे अशा लोकांसाठी मेम्बर्स ओन्ली (paid subscription) असा ग्रूप आम्ही तयार करत आहोत!

अर्थात पेजवर पोस्ट लिहिणे चलूच राहील परंतु पेजवर अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे शक्य होत नाही जे आम्हाला मेम्बेर्स ओन्ली वर शक्य होईल!

तसेच या ग्रुपमध्ये भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाची संगतवार माहिती दिली जाईल, ब्रिटीश कालीन फोटो, जुनी पुस्तके, जुन्या मासिकातील उत्तमोत्तम लेख अशा कमाल लेखांची मेजवानी असेल. पेशवे पेज आणि ग्रुप या दोन्हीवरील लेख हे वेगवेगळे असतील. तसेच इतिहास, भूगोल आणि भटकंती या विषयी आपल्याला असणाऱ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तिथे आपल्याला दिली जातील.

पहिल्या १०० सभासदांसाठी चार्सेसमध्ये सवलत सुद्धा असेल त्यामुळे ज्यांना ज्यांना रस आहे अशांनी Whats app वर संपर्क करा~~

संपर्क - ७०२०४०२४४६

#quality_over_quantity
#School_of_Indian_History


____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });