पुण्यातील 'शनवार' पेठेचा इतिहास

मूर्तझा पेठ हे खरे तर या पेठेचे नाव. परंतु या पेठेचा गाजावाजा झाला तो पेशव्यांनी उभारलेल्या त्यांच्या वाड्यामुळे. पेशवाई मध्ये त्या वास्तूला थोरला वाडा असे नाव होते. अर्थात शनिवार पेठेत असल्याने त्याला पुढे शनिवार वाडा असे म्हणले जाऊ लागले आणि हीच पुण्याची खरी ओळख बनली. रामशास्त्री प्रभुणे यांचा वाडा सुद्धा याच पेठेत होता. पूर्वीच्या काळी शनिवारवाड्याच्या समोरील पटांगणात भाजी मंडई भरत असे.

 पुण्यातील पेठेतील एक प्रातिनिधिक चित्र

सन 1764 साली या पेठेत सुमारे 374 घरे होती पण पुढे जसे जसे शनिवार वाड्याचे महत्व कमी होऊ लागले तसे या पेठेतील वस्ती सुद्धा कमी होऊ लागली. सन 1826 मध्ये या पेठेत फक्त 159 घरे होती.

 शनिवारवाडा परिसरात भरणारा बाजार

शनिवार पेठेतेच ओंकारेश्वर आणि अमृतेश्वर यांच्यासारखी सुंदर पेशवेकालीन मंदिरे आहेत. ओंकारेश्वर मंदिराच्या इथे तर पूर्वी स्मशान होते. पेठेतील अमृतेश्वर मंदिर हे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या बहिणीने बांधले आहे.
शनिवार पेठेत अनेक प्रसिद्ध सरदारांचे वाडे होते. यात सांगलीकर, रास्ते, नातू, मेहेंदळे, गोळे, बिवलकर, थत्ते, राजमाचीकर यांचा समावेश होतो.

ओंकारेश्वर मंदिर परिसर

संदर्भ - Pune Gazetteer, Part 3, Pg. no. 280

© 2020, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });