शनिवारवाडा खरच लाल महाल पाडून बांधला का?

  • August 17, 2020
  • By Shantanu Paranjape
  • 3 Comments

महाराष्ट्रात इतिहासाची मोडतोड करणारी मंडळी कमी नाहीत. त्यात पेशवे म्हणले की याना ब्राह्मण द्वेषाची कावीळ होते आणि येनकेन प्रकारेण पेशव्यांना शिव्या कशा घालता येतील हे बघायला ही पुढेमागे बघत नाहीत. पूर्वी ही लोकं थेट विरोध करायची मात्र आता कुठलेतरी अर्धवट वाक्य उचलायचे आणि संभ्रम निर्माण करून आपला अजेंडा पुढे ढकलायचा असे प्रकार सुरु झाले आहेत. अशाच प्रकारचे लिखाण हल्ली पुन्हा पसरण्यास सुरुवात झाली आहे ते म्हणजे शनिवारवाडा हा लाल महाल पाडून बांधला!! वास्तविक रित्या याला उत्तर देण्यात वेळ घालवणे गरजेचे नाही परंतु हा गैरसमज खूपच पसरत आहे त्यामुळे आपण काही संदर्भ बघूया आणि मग तुम्हीच ठरवा नक्की काय झाले असेल ते. 

Lal Mahal- a famous monument in Pune - About Lal Mahal - How to reach
Add caption

लाल महाल कुठे होता? - 

बाल शिवबा व जिजाबाई हे पुण्यास येणार म्हणल्यावर त्यांच्या वास्तव्याची सोय करणे हे गरजेचे होते.  पुण्यात शिल्लक असलेल्या वस्तीपैकी कोटाच्या आसपास काही घरे शिल्लक होती. ढेरे, वैद्य, झांबरे, ठकार अशी ती काही घराणी. यातील ठकारांच्या आवारात श्री गणेशाची एक स्वयंभू मूर्ती होती. कसब्याचा गणपती असे त्याला नाव होते. याला निजामशाहाने सन १६१८ साली वतन दिले होते.  या गणपतीच्या पश्चिमेला झांबरे पाटीलांची एक मोकळी जागा होती. दादोजी पंतानी ती विकत घेऊन त्यावर वाडा बांधण्याचे ठरवले. त्य बांधलेल्या वाड्यास लाल महाल असे म्हणतात. आजमितीला असलेला लाल महाल हा पूर्वीच्याच एवढा होता का किंवा पूर्वीच्या लालमहालाचे नेमके स्वरूप काय होते हे सांगणे अवघड आहे. शिवकाळातील लाल महालाचे उल्लेख अगदी नगण्य आहेत. 

पेशवेकालीन एका पत्रात मात्र लाल महालाचे काही उल्लेख आढळतात आणि त्याची एकंदर रचना कशी होती हे समजते. सदरील पत्र हे पेशवे दप्तरातून निवडलेले कागद खंड २२ यातून घेतले आहे. सन १७३५ मधील एक हे पत्र आहे. 

पत्राचा सारांश काढायचा पाहिला तर पुढील माहिती मिळते - 

  • सदर वाडा हा दादोजी कोंडदेव यांनी बांधला होता. 
  • राजांच्या महालावर एक दोन घरे बांधून वाडा व्यवस्थित ठेवावा म्हणजे महालात नेहमी वावर होऊन ती जागा निर्मल राहील आणि सध्या राणोजी शिंदे व रामचंद्रपंत यांना राहण्यास घरे होती;.म्हणून रामचंद्रपंत (सुखटणकर) यांना लालमहाल बांधण्यास सांगितले. (याचा अर्थ तो पडलेल्या अवस्थेत असावा. लक्षात घ्या महाराज केवळ ४-५ वर्ष राहिले तिथे. नंतर मुघलांच्या अनेक स्वाऱ्या पुण्यावर झाल्या)
  • बाकी लेखात महालाची जागा कशी कशी होती याचे वर्णन आहे तर ते पत्र संपूर्ण वाचावे. 
दुसरे पत्र वरच्याच पत्राला पूरक असे आहे. वरच्या पत्रात राणोजी शिंदे यांची सोय करण्यासाठी घर बांधण्यास सांगितले व आता खालील दिलेले पत्र हे राणोजी शिंदे कुठे राहतील याबद्दल आहे. तर पत्रात म्हणले आहे की 
"सिंदियास हली नवे घर लालमहाल जुना त्यामध्ये बांधले. तेथे राहणार" बाकी ही माहिती पाहिल्यावर लाल महालचे बाजीराव पेशव्यांनी नेमके काय केले किंवा त्याचा वापर कसा केला हे समजून येते. 

अविनाश सोवनी यांच्या हरवलेले पुणे या पुस्तकात त्यांनी लाल महाल परिसराचा सन १८०० मधील एक अंदाजे नकाशा काढला आहे. तो अगदी बरोबर आहे. तर तो येथे देत आहे. बाकी लाल महालाविषयी सविस्तर माहिती मी वेगळ्या ब्लॉगमध्ये देईनच. तूर्तास एवढेच पुरे..!

 


आता शनिवारवाडा बांधण्याच्या नोंदी पाहू - 

बाजीराव पेशवे पुण्यास आले ते शाहू महाराजांची परवानगी घेऊन. यास कारण म्हणजे सासवड पेक्षा पुणे हे जास्त सोयीस्कर होते ते अनेक कारणांसाठी. पुण्यात आल्यावर काही काळ बाजीराव हे धडफळे यांच्या वाड्यात राहत होते. याची नोंद आपल्याला धडफळे यादीत मिळते. 


१० जानेवारी १७३० रोजी शनिवारवाड्याची पायाभरणी केली गेली आणि वाडा बांधण्यास सुरुवात केली. यासाठी वेगळी जागा विकत घेतली होती. त्याबद्दलची नोंद ही धडफळे यादीत मिळून जाते.